ब्रिटीश महिलेला जाणवला महारुद्र अनुष्ठानाचा महिमा !

स्वातंत्र्यपूर्वकाळात अफगाणिस्थान आणि ब्रिटन यांच्यात युद्ध चालू होते. अलाहाबाद येथे मार्टिन्डेल नावाच्या ब्रिटीश अधिकार्‍यालाही युद्धावर पाठवण्यात आले. तो पत्नीला पत्र लिहित असे. एकदा ‘येेथे प्रसंग बिकट आहे’, असे त्याचे पत्र आले. पत्नी काळजीत पडली होती. एकदा तिने महादेवाच्या मंदिरातील ‘रुद्राभिषेक’ ऐकला. तिने त्याचे महत्त्व विचारून महारुद्राचे अनुष्ठान केले. तीन मासांनंतर अधिकारी परतल्यावर ‘मोठ्या संकटातून वाचलो’, असे त्याने सांगितले. त्या वेळी तो म्हणाला, ‘‘अफगाणी सैन्य आक्रमण करतांना एक बाहुबली त्रिशूळ घेऊन आला. ते पाहून सर्व अफगाणी सैन्य पळून गेले.’’ सौ. मार्टिन्डेल यांनी पतीला शिवमंदिरात नेले. शिवाचे चित्र पाहून ‘हेच ते आहेत, यांनीच मला वाचवले’, असे श्री. मार्टिन्डेल म्हणाले. त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले. पत्नीच्या महारुद्र करण्यामुळे ते वाचले. आजही त्यांची पिढी युरोपहून अलाहाबाद येथील त्या मंदिराचे दर्शन घेण्यास येते’. – डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात