सनातन संस्थेच्या सोशल मीडिया प्रसाराचा जानेवारी २०१७ मधील आढावा

हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हिंदूंवर होणार्‍या आघातांची वस्तुनिष्ठ माहिती देणे आणि धर्माचे विडंबन रोखणे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांचा प्रभावी वापर करून हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे.

१. व्हॉट्स अ‍ॅप प्रणालीद्वारे प्रसाराचा आढावा

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून नियमितपणे धर्मशास्त्र, हिंदूंवरील आघाताच्या वार्ता, तसेच सण, धार्मिक उत्सव यांमागील धर्मशास्त्र दर्शवणारी चलत्चित्रे (व्हिडिओज्) पाठवले जातात. या अंतर्गत जागो हिंदू या व्हॉट्स अ‍ॅप गटांच्या माध्यमातून धर्मशिक्षण आणि आघातांविषयी देण्यात येणारी माहिती प्रतिदिन २ लक्ष ९४ सहस्र ४७४ धर्माभिमानी हिंदूंपर्यंत सध्या पोचत आहे. आतापर्यंत हा प्रसार केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत केला जायचा. या मासापासून (महिन्यापासून) कन्नड भाषेतूनही प्रसाराला प्रारंभ करण्यात आला आहे, तसेच येत्या काही मासांत गुजराती, मल्याळम्, तेलगु आणि तमिळ या भाषांमध्ये या माध्यमातून प्रसार करण्याचे नियोजन आहे.

२. फेसबूक प्रणालीद्वारे प्रसाराचा आढावा

हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत हिंदू अधिवेशन या समितीच्या फेसबूक पानाच्या माध्यमातून एकूण १ कोटीहून अधिक, तर सनातन संस्थेच्या अधिकृत फेसबूक पानाच्या माध्यमातून ९० सहस्रहून अधिक लोकांपर्यंत विषय पोचला. सध्या एकूण ३७ जिल्हास्तरीय फेसबूक पाने कार्यरत आहेत. केवळ मुंबई जिल्ह्याच्या एका पानाच्या माध्यमातून या मासातील एका सप्ताहात ४ लक्ष लोकांपर्यंत विषय पोचला.

३. ट्विटर प्रणालीद्वारे प्रसाराचा आढावा

ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्मजागृतीपर विषय ७ लक्ष ७० सहस्र ८६६ लोकांपर्यंत विषय पोेचला. समितीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून(खात्यावर) (@hindujagrutiorg) १४ लक्षहून अधिक लोकांपर्यंत या मासात विषय पोेचला, तसेच सनातन संस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटमधून (खात्यामधून) (@SanatanSanstha) २ लक्ष ३१ सहस्र लोकांपर्यंत या मासात विषय पोचला.

४. हिंदूसंघटना आणि कार्यकर्ते यांच्यावर केल्या
जाणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदु धर्माभिमान्यांनी
केलेल्या ट्रेंड्सना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूूर्त प्रतिसाद

अ. ७.१.२०१७ या दिवशी बंगालमधील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धर्मप्रेमी संघटनांनी #SaveHindusInBengal या विषयावर ट्विट्स केल्या. हा विषय ४२ लक्ष १८४ जणांपर्यंत पोचला.

आ. १९.१.२०१७ या दिवशी काश्मिरी हिंदू बलिदान दिनाच्या निमित्ताने काश्मीरमधील हिंदूंच्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी समाजातून #19thJan_Hindu_Holocaust_Day या विषयावर ट्विट्स करण्यात आल्या. यामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. हा विषय अंदाजे ४५ लक्ष ३३ सहस्र ६०० जणांपर्यंत पोचला. हा विषय राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या ट्रेंडमध्ये १२ व्या क्रमांकावर आला होता.

इ. अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाच्या माध्यमातून वारंवार भारताचा ध्वज, हिंदु देवता आदींचा चप्पल, बूट इत्यादी उत्पादनांसाठी वापर केला जात होता. याविषयी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चेतावणी देऊनही त्यांनी क्षमा मागितली नाही. या संदर्भात कठोर कारवाई व्हावी, यासाठी #BoycottAmazon या विषयावर ट्विट्स करण्यात आल्या. हा विषय ८६ लक्ष ५६ सहस्र १०९ जणांपर्यंत पोचला.

ई. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने शिवरायांच्या गडांचे संवर्धन व्हावे आणि महाराजांचे शौर्य घराघरात तरुणांपर्यंत पोचावे, यासाठी गडकोट मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेची माहिती सर्वांपर्यंत पोेचावी, यासाठी शिवप्रेमी संघटनांनी #SaveOurForts याविषयावर ट्विट्स केल्या. हा विषय ५९ लक्ष ८० सहस्र जणांपर्यंत पोचला.

– समन्वय कक्ष, सोशल मीडिया, रामनाथी, गोवा. (११.२.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात