आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांत वृद्धिंगत होत असलेले प्रसारकार्य !

डिसेंबर २०१६ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

१. इंदूर येथील नामदेव वाडा या प्रभागातील सरकारी शाळेत आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावरील प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. येथे २ वेळा ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली.

२. २५.१२.२०१६ या दिवशी भाग्यनगर येथील बीरामगुडा येथे श्री गोमाता यज्ञ महोत्सव संस्थानच्या वार्षिकोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनुमाने १ सहस्र जिज्ञासूंनी घेतला.

– श्री. प्रसन्ना, आंध्रप्रदेश (जानेवारी २०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात