सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शन कक्षाचे संतांकडून उद्घाटन

छत्तीसगढ येथे राजीम महाकुंभ

राजीम (छत्तीसगढ) : येथील महानदीच्या किनारी आयोजित करण्यात आलेल्या राजीम महाकुंभमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म विषयक लावण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षाचे २० फेब्रुवारीला संतांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बालयोगेश्‍वर संत श्री रामबालकदास महाराज, श्री श्री सच्चिदानंद तीर्थ महास्वामी, ब्रह्मस्वरूप सिद्धेश्‍वरानंद उघरा महाराज, स्वामी ज्ञानस्वरूपानंद अक्रिय महाराज, सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे आणि श्री स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल, समितीचे कोलकाता समन्वयक श्री. सुमंत देबनाथ आणि धनबाद (झारखंड) येथील समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. निशाली सिंह उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात