बेळगाव येथील साधिका सौ. किरण बंग यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांचा ‘टी-शर्ट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य अवमान रोखला !

‘पुणे येथील श्री. सचिन मुंदडा आणि श्री. संजय झंवर यांनी मथुरा-वृंदावनची यात्रा आयोजित केली होती. मी त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदवले. नंतर मला समजले, ‘आयोजकांनी यात्रेत सहभागी होणार्‍या महिला, पुरुष आणि मुले अशा सर्वांसाठी एकसारखे ‘टी शर्ट’ बनवले आहेत अन् त्या ‘टी-शर्ट’वर ते श्रीकृष्ण आणि राधा यांची चित्रे छापणार आहेत.’ लगेच मी आयोजकांना संपर्क करून सांगितले, ‘‘आपण ‘टी-शर्ट’ धुण्यासाठी तो गरम पाण्यात बुडवतो, ब्रशने घासतो आणि इस्त्री करतो. तसेच तो खराब झाल्यावर कुठेही टाकला जातो. साहजिकच ‘टी-शर्ट’वर देवतांची चित्रे छापल्यामुळे देवतांची विटंबना होते.’’ तेव्हा ती गोष्ट आयोजकांना पटली आणि त्यांनी सांगितले, ‘‘केवळ राधे-राधे लिहूया.’’ (बेळगाव येथील साधिका सौ. किरण बंग यांच्यासारखे साधक हीच हिंदु धर्माची शक्ती आहे. सध्याच्या काळात देवतांची उपासना म्हणून नामजप करण्यासमवेत देवतांचा अनादर रोखला, तर अशा भक्तांवर देवतांची अधिक कृपा होते. सौ. बंग यांच्याप्रमाणे प्रत्येक जण हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्र यांचा अवमान वैध मार्गाने रोखण्यासाठी कृतीशील झाल्यास हिंदु राष्ट्र येणे दूर नाही ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

-सौ. किरण बंग

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात