ओडिशातील ‘राऊरकेला पुस्तक मेळ्या’मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू

राऊरकेला : येथील आदर्श पाठागार या संस्थेद्वारे १ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सेक्टर-५ मधील भंज भवन समोरील पटांगणावर ‘राऊरकेला पुस्तक मेळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्थेकडून आध्यात्मिक, राष्ट्रविषयक आणि आरोग्यविषयक ग्रंथ, तसेच सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ‘राऊरकेला पुस्तक मेळ्या’च्या आयोजनाचे हे २४ वे वर्ष होते. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासूंचा, तसेच धर्म आणि राष्ट्र विषयक कार्यात रूची असणार्‍या अनेक व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘विश्‍वशांती ब्रह्मा एकाक्षर महायज्ञा’मध्ये सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

राज्यातील उदास पंथ या संप्रदायाद्वारेे राऊरकेलामधील सेक्टर १३ मधील मेलण मैदानावर ४ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ‘विश्‍वशांती ब्रह्मा एकाक्षर महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाच्या वेळी सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अनेक धर्मप्रेमींनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट दिली.

क्षणचित्रे

१. उदास पंथाचे प्रमुख ब्रह्मचारी रवींद्र दासजी यांच्याकडे सनातनचे प्रदर्शन लावण्यास अनुमती मागीतली असता त्यांनी ती मन:पूर्वक दिली.

२. त्यांचे शिष्य श्री. सत्यरंजन उपाख्य टूलू दास यांनी यज्ञ आयोजन सेवेत खूप व्यस्त असूनही स्वत: लक्ष देऊन प्रदर्शनासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात