हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेचे पाठबळ अत्यावश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथील प्रांतीय अधिवेशनाला ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज आणि श्री. मनोज खाडये

कोल्हापूर : आज पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक हिंदु धर्म-संस्कृती यांना बुडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोक परकीय साहाय्य घेऊन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्याला सामूदायिक कृती करावी लागेल. हिंदुत्वाचे जे कार्य करतात अशी गणेशोत्सव मंडळे, तरुणांची मंडळे, सामाजिक मंडळे यांतील तरुणांमध्ये हिंदुत्वाचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करा, असे मार्गदर्शन सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केले. ते गोकुळ-शिरगाव येथील श्री भगवती मंगल कार्यालयात झालेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पश्चिपम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशनासाठी बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी सातारा येथील पू. विठ्ठल स्वामी यांचीही वंदनीय उपस्थित होती, त्यांचा सन्मान डॉ. मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांचा सत्कार सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे यांनी केला, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मान सौ. अरुणा पेडणेकर यांनी केला, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार कोल्हापूर येथील हिंदु धर्माभिमानी श्री. गोविंद देशपांडे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.

या वेळी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज म्हणाले…

१. महाराष्ट्र ही भूमी संत आणि वीरपुरुष यांची आहे, हे आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आपल्यावर असलेले दायित्वही अधिक आहे.

२. हिंदु धर्म हा श्रद्धेवर उभा आहे; मात्र ज्यांचे डोळेच आंधळे आहेत ते हिंदु धर्मातील गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात.

३. हिंदु धर्माला पर्याय नाही, हे लक्षात घेऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडता हिंदु तरुणांनी काम केले पाहिजे.

हिंदु राष्ट्राचे केवळ साक्षीदार नव्हे, तर भागीदार होण्यासाठी प्रयत्न करा ! – मनोज खाडये

आज लोकशाहीचे चारही स्तंभ डळमळीत झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, न्यायालय यांसह प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. धर्माची प्रेरणा देणारी मंदिरे, मठ यांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंढरपूर येथील मंदिरांमध्ये ज्यांना हिंदु धर्माचे ज्ञान नाही, अशांची नियुक्ती केली आहे. ‘चित्रपट’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ ही आक्रमणे आहेत, तर क्षुल्लक कारणांवरून हिदूंना मारहाण केली जात आहे. अशा वेळी आपल्याला लोकांना हिंदु धर्म म्हणून एकत्र आणावे लागेल आणि कृतीसाठी उद्युक्त करावे लागेल. भविष्यात हिंदु राष्ट्र येणारच असून आपल्याला हिंदु राष्ट्राचे केवळ साक्षीदार नव्हे, तर भागीदार होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे मार्गदर्शन श्री. मनोज खाडये यांनी केले. ते ‘हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर बोलत होते.

हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेचे पाठबळ अत्यावश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आज मानसिक पातळीवर हिंदुत्वाचे कार्य, तसेच राष्ट्रकार्य करणारे अनेक आहेत; मात्र तेथे ईश्ववराचे अधिष्ठान नसल्याने हे कार्य अधिक काळ टिकत नाही. याउलट सनातन संस्थेसारखी संघटना जे प्रत्येक कार्य साधना म्हणून करते ते यशस्वी होते. सनातनच्या साधकांना कारागृहात जावे लागल्यावर त्यांनी केवळ तेथे साधना केली नाही, तर अन्य बंदीवानांना साधना करण्यास प्रवृत्त केले. एवढेच नाही, तर तेथील पोलीसही साधना करू लागले. साधनेच्या पाठबळामुळे कारागृहात असूनही ते आनंदी होते. धर्मांधांच्या विरोधात लढतांना आपण रज-तम यांच्या विरोधात लढत असल्याने आपल्याला सत्त्वगुणी म्हणजेच साधना करणारा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेचे पाठबळ अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात साधना करण्याचे महत्त्व’, या विषयावर बोलत होत्या.

क्षणचित्र : या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी ‘जय श्रीराम’, ‘हरहर महादेव’, ‘भारत माता की जय’ अशा उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या, यामुळे वातावरणात वीररसपूर्ण उत्साह निर्माण झाला.

हिंदूंवर होणारे अत्याचार लोकांसमोर आणण्याचे काम करणारे एकमेव दैनिक म्हणजे सनातन प्रभात होय ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

ज्यांना आपण आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो ती प्रसिद्धीमाध्यमे आज वाचकांना नेमके काय देत आहेत ? आज हिंदूंवर होणारे अत्याचार कोणतीही प्रसिद्ध माध्यमे लोकांसमोर आणत नाहीत. याउलट दैनिक सनातन प्रभात हे सत्य सांगणारे दैनिक असून करण्यातून हिंदूंवर जे अत्याचार होतात, ते लोकांसमोर आणण्याचे कार्य करत आहे. त्यासाठी प्रत्येक दैनिक सनातन प्रभात वाचले पाहिजे.

हिंदूंच्या व्यापक आंदोलनामुळे शिवाजी विद्यापिठाच्या नामांतराचा विषय अनेकांपर्यंत पोेचवणे शक्य ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

कोणतीही समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास ती सुटू शकते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे नामांतर होण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभा, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, निवेदन या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. या संदर्भात व्यापक स्तरावर आंदोलन उभे राहिले आणि हा विषय अनेकांपर्यंत पोेचवणे शक्य झाले.