सनातन संस्थेचा रक्षणकर्ता श्रीकृष्ण असल्याने तिला कोणीही संपवू शकत नाही ! – पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा

वाघोदा, तालुका रावेर : आपण आज ६८ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आजची प्रस्थापित व्यवस्था अन्यायकारक असून निरपराध संत आणि सनातनचे साधक यांना खोट्या गुन्ह्याखाली गोवले जात आहे. त्यांच्याविरुद्धचा खटलाही चालवण्यात पोलीस प्रशासन चालढकल करत आहे. सनातन संस्थेला संपवण्याचा कट काही पुरोगामी, साम्यवादी बांडगुळांकडून केला जात आहे; पण सनातनचा रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळे सनातन संस्था कोणीही संपवू शकत नाही, असे मार्गदर्शन सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी येथे २६ जानेवारीला झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत केले.

सभेचा प्रारंभ श्री. श्रेयस पिसोळकर यांनी शंखनादाने केला. श्री. किशोर काळे गुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पू. नंदकुमार जाधव यांचा सन्मान श्री. प्रभाकर महाजन यांनी केला, तर रणरागिणीच्या कु. रागेश्री देशपांंडे यांचा सत्कार वाघोदा येथील सरपंच सौ. सुलभा पाटील यांनी केला. श्री. प्रशांत जुवेकर यांचा सत्कार धर्माभिमानी श्री. राहुल महाजन यांनी केला. धर्मप्रेमी श्री. योगेश पाटील यांचा सत्कार पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

निर्भया आणि कोपर्डी यांसारख्या घटना
रोखण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – कु. रागेश्री देशपांडे

निर्भया आणि कोपर्डीच्या घटना आता जळगाव जिल्ह्यातही घडत आहेत. ही दुष्प्रवृत्ती ठेचण्यासाठी महिला आणि मुली यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आपण धर्माचरण करून धर्माभिमान वाढवला पाहिजे. धर्माधांकडून बांगड्या भरून घेऊ नका. भ्रमणभाष ‘रिचार्ज’ करू नका. फळभाजी विकत घेऊ नका. त्यांच्या रिक्शात बसू नका.

हिंदूंनो, संघटित होऊन राष्ट्र आणि धर्म
यांसाठी वेळ द्या ! – श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

खरे प्रजासत्ताक राज्य छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य यांचे होते. आज आतंकवाद्यांना देशभक्त समजले जाते आणि गोरक्षा करणारे किंवा देवतांचे विडंबन रोखणारे यांना आतंकवादी संबोधले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी वेळ द्यायला हवा. येथून जवळच असलेल्या बलवाडी गावात हिंदू संघटित झाल्याने भोंगा उतरवावा लागला. सर्व हिंदूंनी अशा प्रकारे संघटित व्हायला हवे !

उपस्थित मान्यवर

निंभोरा येथील ह.भ.प. सुभाष महाराज, काचूरचे सरपंच श्री. रवींद्र महाजन, भातखेडा येथील उपसरपंच श्री. दीपक पाटील, सावदा येथील भाजपचे नगरसेवक अजय भारंबे, फैजपूर येथील शिवसेनेचे नगरसेवक श्री. अमोल निंबाळे, सावदा येथील माजी नगरसेवक श्री. शाम अकोले, सावदा येथील बजरंग दलाचे शहराध्यक्ष श्री. भारंबे, यावलचे शिवसेना उपतालुका प्रमुख श्री. राजू काठोके, मस्कावदचे सरपंच दिलीप सपकाळे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात