प्रत्येक हिंदूमध्ये धर्मतेज निर्माण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

वनोठा पाडा, पेल्हार (नालासोपारा, जिल्हा पालघर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

सौ. नयना भगत, दीपप्रज्वलन करतांना श्री. सुमित सागवेकर

नालासोपारा (जिल्हा पालघर) : आज हिंदु युवतींवर ‘लव्ह जिहाद’चे संकट ओढवले आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी धर्मशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक हिंदूमध्ये धर्मतेज निर्माण करायला हवे. आपण हिंदु आहोत, हे आपल्या आचरणातून दिसायला हवे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी केले. येथील वनोठा पाडा, पेल्हार येथे २६ जानेवारीला झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी ६ दिवसांत सभेचा तळमळीने प्रसार आणि आयोजन केले. श्री. विजय जोशी गुरुजी आणि ब्रह्मवृंद यांनी वेदमंत्रपठण केले. सभेला ३०० हिंदू उपस्थित होते. फेसबूकच्या माध्यमातून २३ सहस्र जणांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला. धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी १ फेब्रुवारीला येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सायंकाळी ७ वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘श्रीकृष्ण पाठीशी आहे’, या श्रद्धेने धर्मकार्य करा !
– श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

२५ डिसेंबरला वनोठा पाडा येथे धर्मांतरासाठी आलेल्यांना येथील धर्माभिमान्यांनी रोखलेे. प्रलोभने दाखवून धर्मांतर करू पहाणार्‍यांना रोखणार्‍या येथील धर्माभिमान्यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घ्यावा. ‘श्रीकृष्ण पाठीशी आहे’, या श्रद्धेने धर्मकार्य करायला हवे, तरच आपला विजय निश्‍चित आहे.

क्षणचित्रे

१. दोन पोलीस शेवटपर्यंत सभास्थळी होते.

२. सभेपूर्वी दिवसभर तेथे वादळ होते; मात्र प्रार्थना करून सभास्थळाभोवती तीर्थाचे मंडल केल्यावर वादळ थांबले. प.पू. पांडे महाराज आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दिलेले उपाय केल्यामुळे सभा निर्विघ्नपणे पार पडली.

सभेला सहकार्य करणार्‍या धर्माभिमान्यांचे आभार !

सभेला पोलीस, प्रशासन, तसेच सर्वश्री बाळू हरवटे, काशिनाथ हरवटे, मनोज महालकरी, महेश निंबरा, विलास नाईक, अशोक हरवटे आणी सोनिया काटेला यांचे सहकार्य लाभले. चंद्रकांत फरले, गणेश फरले, अनिल तांडेल, दिनेश तांडेल, रोहित निंबारा, अविनाश निंबारा, हरेश कारेला, श्याम कारेला, शिवराज कुंभारे, गणेश हरवटे, विकास हरवटे, सुभाष कुडवे, विकास यादव, नितीन कुडवा, शांताराम कुडवा, रोहित निबरा, अविनाश निबरा, सचिन हरवट, रोहन बुजड, दिनेश कारेला, विशाल दवले, सुनील बारे, हरिश कारेला, सागर अहिरे, रूपेश वाडे, चंद्रहास्य सरकोंडावर, रवींद्र हरवटे यांनी सभेचा प्रसार, उभारणी आणि आयोजन केले. ओमकार डेकोरेटरचे श्री. जयेंद्र पाटील (भाई पाटील) यांनी सभेसाठी पोडियम, कनात, पटल विनामूल्य उपलब्ध करून दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात