जानेवारी २०१७ मधील पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या कार्याविषयी घडलेल्या चांगल्या घटना

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१. मागील वर्षी ३१ डिसेंबर साजरा न करण्याविषयी
सनातनच्या साधकाने फलकावर लिहिलेला मजकूर वाचून
जेष्ठ नागरिकांनी सलग २ वर्षे पाश्‍चात्त्य ३१ डिसेंबर साजरा न करणे

‘एक साधक मकरसंक्रांतीची माहिती फलकप्रसिद्धीच्या दृष्टीने फलकावर लिहित असतांना तेथील गृहस्थ म्हणाले, ‘‘तुम्ही मागच्या वेळी ३१ डिसेंबर साजरा का करू नये ?’, याविषयी फलकावर मजकूर लिहिला होता. तो वाचून आमच्या जेष्ठ नागरिकांची एक बैठक झाली आणि ३१ डिसेंबर साजरा न करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवले. या वेळीही आम्ही ३१ डिसेंबर साजरा केला नाही.’’

२. साधकाला फलक लिहितांना पाहून उपस्थित व्यक्तीने सनातनच्या कार्याचे कौतुक करणे

एका केंद्रातील साधक एका मंदिरातील फलक लिहितांना तेथे उभी असलेली एक व्यक्ती तिथे असलेल्या लोकांना म्हणाली, ‘‘हे सनातनवाले आहेत. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे.’’

३. सनातनच्या साधिकेने पत्ता विचारणार्‍या एका महिलेला साहाय्य करणे आणि सनातनच्या साधकांमध्ये चांगले संस्कार असल्याचे लक्षात येऊन ती भारावून जाणे

एक साधिका बसमधून उतरल्यानंतर तिला एक महिला इतरांना ‘अमुक ठिकाणी कसे जायचे ?’, हे विचारत होती. तेव्हा सनातनच्या एका साधिकेने त्या महिलेला म्हटले, ‘‘मी तुम्हाला मार्ग दाखवते. माझ्यासमवेत चला.’’ त्यानंतर त्या दोघी जात असतांना वाटेत साधिकेला सनातन प्रभातचे वर्गणीदार आणि सनातनची उत्पादने घेणारे काही जिज्ञासू भेटले. ते सर्व साधिकेच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. ते पाहून त्या महिलेने विचारले, ‘‘तुम्ही इथेच रहाता का ? हे सर्व तुम्हाला ओळखतात का ?’’ त्यावर ती साधिका म्हणाली, ‘‘मी सनातनची साधिका आहे. ज्यांनी माझी विचारपूस केली, ते सनातन प्रभात आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घेतात; म्हणून ते मला ओळखतात.’’ तेव्हा ती महिला म्हणाली, ‘‘हे सनातनचे संस्कार आहेत. मी तुम्हाला पत्ता विचारलाही नव्हता, तरी तुम्ही स्वतःहून मला साहाय्य केले.’’ हे बोलतांना त्या महिलेला भरून आले होते.

४. मंदिरातील आरतीनंतर धर्मशिक्षणवर्गाची वेळ आणि
वार आदी माहिती असलेल्या चिठ्ठ्या वाटल्याने धर्मशिक्षणवर्गातील उपस्थिती वाढणे

५.१.२०१७ या दिवशी श्री गजानन महाराज मंदिरामध्ये आरतीनंतर धर्माभिमान्यांनी धर्मशिक्षणवर्गाची वेळ आणि वार आदी माहिती असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या. या सेवेत धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. स्वप्नील बनकर आणि श्री. श्रीधर केळकर हे सहभागी झाले होते. त्यामुळे धर्मशिक्षणवर्गाची उपस्थिती वाढली. यामध्ये अनेक तरुण धर्मप्रेमी मुलांचा सहभाग वाढला. सर्व जण धार्मिक आणि राजकीय स्थिती यांविषयी बोलू लागले. पहिल्याच वर्गात सर्वांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्याची आवश्यकता अन् इच्छा व्यक्त केली.’

– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका (जानेवारी २०१७)