पनवेल येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन

पनवेल : येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेच्या साधिका सौ. पुष्पा चौगुले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी साधना, नामजप यांचे महत्त्व आणि समष्टी साधनेची आवश्यकता विशद केली. मार्गदर्शनाचा लाभ संघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार जोशी, उपाध्यक्षा सौ. शामल आंग्रे यांच्यासह १७५ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. अनेकांनी मार्गदर्शन चांगले झाल्याचे सांगितले, तसेच विषयाच्या अनुषंगाने ग्रंथ उपलब्ध असल्याची विचारणा केली. तरुणांसाठी अशा प्रकारे मार्गदर्शन घेण्याविषयी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात