माणगांव (जिल्हा कोल्हापूर) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे ‘वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने श्री वैष्णवीदेवी मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम २ फेब्रुवारीला झाला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी प्रवचन केले. त्यात नामजपाचे महत्व, धर्मशिक्षणाची आवश्यकता, लव्ह जिहाद यांविषयी माहिती देण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक माणगांवचे उपसरपंच श्री. राजू मगदूम आणि त्यांच्या पत्नी सौ. मीनल उपस्थित होत्या. प्रवचनानंतर महिलांनी उत्स्फूर्तपणे शंकानिरसन करून घेतले.

धर्मांधांकडून ‘लव्ह जिहाद’ माहितीला आक्षेप !

प्रवचन संपल्यानंतर एक धर्मांध म्हणाला, ‘‘तुम्ही लव्ह जिहादविषयी जे बोललात, ते चुकीचे आहे. तुमचे बोलणे भडकाऊ होते. माणगांवमध्ये आम्ही हिंदू-मुसलमान गुण्या गोविंदाने रहातो.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात