‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यासाच्या वतीने वरसोली (रायगड) येथील शाळेत क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

फ्लेक्स प्रदर्शन पहातांना विद्यार्थी

रामनाथ (अलिबाग) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा, तसेच त्यांच्यातील राष्ट्राभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने येथील आय.ई.एस्. शाळा वरसोली येथे क्रांतिकारकांच्या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले. सनातन संस्था, कोल्हापूर न्यासाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १ली ते ९वी चे एकूण ९५० विद्यार्थी आणि ३० शिक्षक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी सध्या शाळांमधून देशाचा खरा इतिहास शिकवला जात नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी या प्रदर्शनाला चांगले सहकार्य केले.

क्षणचित्रे

१. विद्यार्थी प्रदर्शनातील संपूर्ण माहिती लिहून घेत होते.

२. मुख्याध्यापिका सौ. वार्डे यांनी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्यांचे व्याख्यान घेण्यास सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात