मकरसंक्रातीनिमित्त महाराष्ट्रात झालेल्या विविध कार्यक्रमांत सनातन संस्थेद्वारे धर्मप्रसार

तीळगूळ वाटप, स्नेहमेळावे, हळदीकुंकू कार्यक्रम या माध्यमांतून महिलांना धर्मशिक्षण

धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मार्गदर्शनाचा लाभ घेतांना महिला

जळगाव

येथील मुक्ताईनगर भागातील श्री हनुमान मंदिरात सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेदीय दृष्टीकोन, तसेच मकरसंक्रातीचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले. या उपक्रमाचा लाभ ८० महिलांनी घेतला. आयुुर्वेद तज्ञ सौ. हर्षदा पाटील, तसेच सनातनच्या सौ. सौख्या चौधरी यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

भोर

निगडे, भोर (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ पार पडला. या वेळी सौ. राजश्री तिवारी यांनी धर्मशिक्षणाची आवश्यकता विशद केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचा लाभ ८० हून अधिक महिलांनी घेतला. भोर शहरातही रणरागिणी शाखेच्या वतीने झालेल्या हळदी-कुंकू समारंभाचा लाभ ३२ हून अधिक महिलांनी घेतला. निगडे गावातील हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी केले होते. निगडे आणि भोर येथे महिलांनी उत्स्फूर्तपणे धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.

फलटण (जिल्हा सातारा)

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंगणगाव, तावडी आणि ढवळेवाडी येथे तीळगूळ स्नेहमेळावा घेण्यात आला. धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी मेळाव्यांचे नियोजन केले होते. हिंगणगाव येथील लोकांनी सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान समाजाला उपयुक्त आहे. असे ग्रंथ वाण म्हणून देणे योग्य आहे. त्यामुळे येथून पुढे मकरसंक्रातीला वाण म्हणून देऊ, असे सांगितले. ढवळेवाडी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

अमरावती

येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाकडून भ्रूणहत्या या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी केले. या वेळी एकूण ७० महिला उपस्थित होत्या.

मिरज

सनातन संस्था मिरज न्यासाच्या वतीने शिवसेनेचे श्री. आनंद राजपूत यांच्या घरी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सामूहिक हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी सौ. वैशाली राजहंस यांनी मकरसंक्रातीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

नागपूर

येथे मकारसंक्रातीचे महत्त्व आणि ती साजरा करण्याच्या पद्धती या विषयावर श्री. अतुल आर्वेन्ला यांनी प्रवचन घेतले. प्रवचनास ३५ जिज्ञासू महिलांची उपस्थिती होती.

नाशिक

येथील काळाराम मंदिरात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना तीळगूळवाटप करण्यात आले. २५० लोकांनी त्याचा लाभ घेतला. या वेळी एका जिज्ञासू महिलेने समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धताही दर्शवली. जेऊर पाटोदा (कोपरगाव) येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी शेणाने सारवून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली. या वेळी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. १२५ हून अधिक महिलांनी त्याचा लाभ घेतला.

रायगड

येथे ११ ठिकाणी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी देण्यात आलेली हस्तपत्रके पाहून काही महिलांनी सांगितले, ही पत्रके आम्ही आमच्या मैत्रिणींनाही देऊ.

सोलापूर

येथे संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्माभिमान्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. १ मासातून एकदा सर्वांनी भेटण्याची मागणीही केली. समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. सर्वांना हिंदु राष्ट्राची संकल्पना आवडली. अनेक जण कार्यात सहभागी होण्यास सिद्ध झाले. धर्माभिमानी श्री. बसवराज जमखंडी यांनी मित्रांना समितीविषयी माहिती देऊन सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले. येथे सुनीलनगर भागात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचा लाभ ६० महिलांनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन आणि सिद्धता वन्दे गोमात्रम् बहुद्देशीय संस्थेने केली होती. कार्यक्रमाच्या प्रसारासाठी फलकप्रसिद्धीही करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात