दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या विरोधात सनातन संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा !

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

फोंडा (गोवा) – सनातन संस्थेच्या वाढत्या प्रसाराची व्याप्ती आणि संस्थेचा समाजातील नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने फॉर धिस कल्ट, क्रिटीक्स आर् डेमॉन्स या मथळ्याखाली संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख त्यांच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाली; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा सनातन संस्थेने फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना ११.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटीची रक्कम रुपये १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिसीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते श्री. गजानन नाईक, श्री. नागेश ताकभाते, कु. दीपा तिवाडी आणि श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक जॉय पूरकायास्था ; मालक बेनेट कोलमन अ‍ॅण्ड कंपनी लि.; मुद्रक आणि प्रकाशक श्री. रणजित जगदाळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात प्रविष्ट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात