धादांत खोटे वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याप्रकरणी दैनिक लोकसत्ताला सनातनची कायदेशीर नोटीस !

पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि त्यामुळे सनातन संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने १२ सप्टेंबर २०१६ या दिवशीच्या अंकात पृष्ठ ७ वर सनातनच्या आठवलेंची चौकशी करा, या मथळ्याखाली मानहानीकारक खोटे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मालक इंडियन एक्स्प्रेस प्रा.लि., मुद्रक आणि प्रकाशक वैदेही ठकार यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हानीभरपाईची रक्कम नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या मुदतीत न दिल्यास हानीभरपाई वसूल करण्यासाठी संस्थेला न्यायालयात दिवाणी दावा दाखल करणे भाग पडेल आणि तसे करावे लागल्यास दाव्याचा खर्च अन् होणार्‍या सर्व परिणामांना आपणास उत्तरदायी धरण्यात येईल, अशी समज या नोटिशीतून देण्यात आली आहे, तसेच कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात