हिंदू सिंहांनो, जागे होऊन आपले मूळ स्वरूप जाणून घ्या ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून घाटकोपर येथे धर्मजागृती सभेचे यशस्वी आयोजन !

घाटकोपरमध्ये धडाडली हिंदुत्वाची तोफ !

तलवार उंचावून सर्वांमध्ये वीरश्री निर्माण करणारे वक्ते

मुंबई : हिंदु राष्ट्र निवडणुकीतून येणार नसून त्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. आज कोणताही पक्ष सत्तेवर आला, तरी तो हिंदूंना साहाय्य करेलच असे नाही. त्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यरूपी युद्धातील एक सैनिक बनून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध होण्याची आवश्यकता आहे. या युद्धानंतरच पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ जानेवारीला बाबू गेनू मैदान, साईनाथ नगर मार्ग, घाटकोपर (प.) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ५६० धर्माभिमानी हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावले.

मागील काही वर्षांपासून घाटकोपरमध्ये अवैधपणे विकले जाणारे अमली पदार्थ आणि त्याला बळी पडलेल्या तरुणांच्या संख्येमध्ये दिवसागणिक होत चाललेली वाढ, अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता उद्दामपणा, धर्मांधांचे वाढते संख्याबळ आणि त्यातूनच गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ, लव्ह जिहादच्या घटना, ख्रिस्त्यांनी आमिषे दाखवून गरिबांचे केलेले धर्मांतर यांमुळे येथील स्थानिक हिंदु जनता पिचली होती. हिंदूंना नवचैतन्य देण्यासाठी, त्यांच्यामध्ये धर्माभिमान रुजवण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता स्पष्ट करण्यासाठी घाटकोपरमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचा निश्‍चय केला. ‘योगेश्‍वर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने धर्मजागृती सभा यशस्वी होणारच आहे’, असा भाव ठेवून सभेच्या प्रसारासाठी दिवसरात्र एक केले आणि १५ जानेवारीला ही हिंदु धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडली.

या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्थित होते. सभेच्या आरंभी पंडित संतोष पांडे शास्त्री यांनी शंखनाद केला. वेदमंत्रपठणानंतर श्री गणेश आणि ग्रामदेवता माता पद्मावती यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलेे. त्यानंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. धर्मजागृती सभेचे सूत्रसंचालन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. सभेच्या शेवटी उपस्थितांनी श्री. प्रसाद वडके यांच्यासमवेत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाची शपथ घेतली. सभेचा समारोप ‘सज्जनम् सुखिन सन्तु…।’ या श्‍लोकाने करण्यात आला.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर पुढे म्हणाले की…

१. वर्ष २०१७ हे अटकेत असलेले निरपराध हिंदु संत आणि धर्माभिमानी हिंदू यांच्या सुटकेचे वर्ष असेल. गुन्हे प्रविष्ट झालेल्या हिंदूंना हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून न्यायिक साहाय्य केले जात आहे.

२. आज आपल्या देशात शाळा-महाविद्यालयांतून खोटा इतिहास शिकवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शिकवलाच जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांंच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन

पू. संभाजी भिडेगुरुजी महाराष्ट्रात कार्य करत असतांना संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवून अफझलखानाच्या थडग्याचे रक्षण करण्याची मागणी करत आहेत. अशा संघटनांना विरोध करण्याची आवश्यकता आहे.

३. हिंदु राष्ट्राची मागणी असंविधानिक नसून गोरक्षा, गंगारक्षा, संस्कृती रक्षा, समान नागरी कायदा, कलम ३७० कालांतराने काढून टाकणे यांसारख्या सर्व गोष्टींची संविधानात तरतूद आहे.

४. सरकारकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. सनबर्नसारखे तीन सहस्र कार्यक्रम करून त्यातून मिळणार्‍या निधीतून हे पैसे उभारणार असल्याचे आता काही मंत्री सांगत आहेत. सनबर्नसारखे कार्यक्रम आयोजित करणारे हिंदु राष्ट्राच्या बाजूने आहेत का, याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संंभाजी महाराज यांंना
समजून घेण्यासाठी गडकोट मोहिमेवर गेले पाहिजे ! – अशोक शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मानकोजी दहातोंडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, हिरोजी फरजत, संभाजी शाहुजी, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांसारख्या असंख्य मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिली. हिंदूंमधील तेज लोप पावत चालल्यामुळे आजमितीला असे मावळे सिद्ध होत नाहीत. अशी सिद्धता होण्यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज विद्यापिठात गेले पाहिजे. ही विद्यापिठे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जवळून अनुभवले, असे गडकोट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो; पण केवळ असे म्हणून चालणार नाही, तर त्यांचे गुण आपल्या रक्तात उतरले पाहिजेत. आपल्यामध्ये हिंदु स्वराज्यासाठी त्याग, निष्ठा निर्माण करायची असेल, तर गडकोटांवर जायलाच हवे. १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड पावन खिंडीमार्गे गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली असून यामध्ये हिंदूंनी बहुसंख्येने सहभागी व्हावे !

मान्यवरांचे विचार

हिंदू सिंहांनो, जागे होऊन आपले मूळ स्वरूप जाणून घ्या ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

एकदा स्वामी विवेकानंदांसमोर एका इंग्रज वक्त्याने भारतियांना हीन संबोधले. स्वामीजींनी सर्वांसमोर त्याच्या कानशिलात लगावली आणि म्हणाले, ‘भारतीय कुत्रे नाहीत, तर सिंह आहेत.’ भारतीयत्व आणि हिंदुत्व यांचा असा अभिमान आपल्याला स्वतःत निर्माण करायचा आहे. आज हिंदूंची अवस्था शेळ्यांच्या कळपात चुकून गेलेल्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे झाली आहे. शेळ्यांच्या कळपात राहिल्याने छावा शिकार करायचे विसरून गेला आहे. आज या सिंहाला विहिरीवर नेऊन त्याचे मूळ प्रतिबिंब आणि शौर्य दाखवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंमधील शौर्य जागृत झाले की, पाकिस्तानातील आतंकवादी केंद्रे नष्ट होण्यास आणि हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये समर्पित व्हा ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

सहिष्णु असल्यामुळेच हिंदूंची श्रद्धा आज सर्रास पायदळी तुडवली जाते. शासनाच्या कह्यात असलेल्या बहुसंख्य मंदिरांचे घोटाळे आज उघड होतांना दिसत आहेत. शालेय अभ्यासक्रमात हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवला जात नसल्याने हिंदूंमध्ये पराभूत मानसिकता निर्माण होत चालली आहे. तरुणांनी हिंदूंच्या पराक्रमी विजयाचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या नि:स्सीम ध्येयासाठी तन, मन, धन समर्पित करून सहभागी होण्याची आज वेळ आली आहे. सामाजिक, मानसिक आणि धार्मिक समस्यांवर संघटन, संघर्ष आणि साधना हेच पर्याय असून सर्वांनी ईश्‍वर संकल्पित हिंदु राष्ट्राच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा घेऊन समर्पित होऊया.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना धर्माभिमानी सौ. सुषमा नाईक
सौ. नयना भगत (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना धर्माभिमानी सौ. मंगल ठाकूर
श्री. प्रसाद वडके (डावीकडे) यांचा सत्कार करतांना धर्माभिमानी श्री. धर्मेश पटेल
सभेला उपस्थित धर्माभिमानी

सभेच्या आयोजनात आणि प्रसारात सक्रिय सहभागी संघटना अन् मंडळे

बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु एकता जागृत समिती, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, मायबोली प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, शिव मल्हार प्रतिष्ठान, शिव आरती संघ, नित्यानंद हिंदू युवा मंच

धर्मकार्यात सहभाग घेणारे मान्यवर

माजी शिवसेना उपविभागप्रमुख श्री. गजानन भोसले, शिवसेना उपविभागप्रमुख श्री. सुभाष पवार, शिवसेना उपविभागप्रमुख श्री. सुरेश पाटील, मनसेचे स्थानिक नगरसेवक श्री. संजय भालेराव, समाजसेवक श्री. राजू घुगे, श्री. पप्पा सावंत, श्री. सुनील शितप, शिवसेना महिला संघटक सौ. संजना सारंग, भाजप वार्ड अध्यक्ष श्री. दामू शर्मा, भाजपचे श्री. विजय शेट्टी

धर्मजागृती सभेचा प्रसार करतांना आलेला वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

घाटकोपरमधील असल्फा येथील श्री स्वामी नारायण संस्कारवर्गातील युवकांसमोर हिंदु धर्मजागृती सभेचा विषय मांडला असता त्यांतील दोन तरुणांनी अन्य दोन ठिकाणी चालणार्‍या संस्कारवर्गांमध्ये धर्मजागृती सभेचा विषय मांडण्याची अनुमती घेतली. त्यामुळे तेथेही सभेचा विषय घेण्यात आला.

धर्मजागृती सभेच्या कालावधीतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

१. धर्मजागृती सभेला संबोधित करण्यात आलेल्या वक्त्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. शिवप्रेरणा झांज पथकाने सभेच्या व्यासपिठाजवळ केलेल्या ढोल-ताशांच्या गजराने आसमंतात उत्साह निर्माण झाला होता.

२. प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावरील लिखाण लोक थांबून लिहून घेत होते, तर काहींनी फलकांचे त्यांच्या भ्रमणभाषमध्ये छायाचित्र काढले.

३. धर्मजागृती सभेच्या वक्त्यांना तलवारी भेट देण्यात आल्या. त्यांनी त्या उंचावून उपस्थित धर्माभिमान्यांमधील धर्मतेज जागवले. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे उपस्थितांमध्ये वीरश्री निर्माण झाली होती.

४. धर्मजागृती सभेनंतर व्यासपिठाजवळ घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी समाज आणि धर्मकार्य करत असतांना त्यांना येणारे अनुभव कथन केले, तसेच येणार्‍या अडचणी सांगून त्यावरील उपाययोजनाही समजून घेतल्या. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

देशासाठी प्राणार्पण करणार्‍या बाबू गेनूच्या नावे असलेल्या मैदानात
तरुण अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी जमणे हे दुर्दैवी – प्रसाद वडके

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर व्यथित झालेल्या, तसेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशी दिली गेल्याचे ऐकून इंग्रज शासनाच्या विरोधात चिडून उठलेल्या ज्या बाबू गेनूने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मुंबईत येणार्‍या विदेशी मालाच्या ट्रकखाली झोपून प्राणांचे बलीदान दिले, त्या बाबू गेनूच्या नावे असलेल्या मैदानात प्रतिदिन सायंकाळी सातनंतर गर्दुल्ले एकत्रित येऊन अमली पदार्थांचे सेवन करतात. ज्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारकांनी आपले प्राणार्पण केले, ती तरुण पिढी ध्येय समोर नसल्यामुळे अमली पदार्थांच्या आहारी जाऊन वाया जात आहे. आज हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय समोर ठेवण्याची वेळ आली आहे.

फेसबूकच्या माध्यमातून सभेचे थेट प्रक्षेपण

अधिकाधिक हिंदूंना धर्मसभेचा लाभ घेता यावा, यासाठी सभेचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे १ लाख १७ सहस्र जणांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला. १३ सहस्रांहून अधिक हिंदूंनी धर्मजागृती सभेच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.

धर्मजागृती सभेच्या यशस्वीतेसाठी यांचे लाभले मोलाचे सहकार्य

सप्तश्रृंंगी डेकोरेटर्स, गणेश डेकोरेटर्स, लेदोरे डेकोरेटर्स, महालक्ष्मी डेकोरेटर्स, झपाटा डेकोरेटर्स

विशेष सहकार्य

१. हिंदु एकता जागृत समितीने धर्मजागृती सभेच्या सिद्धतेसाठी समितीचे प्रशस्त कार्यालय मागील एक मासापासून वायफाय सुविधेसह विनामूल्य उपलब्ध करून दिले, तसेच धर्मजागृती सभेच्या मार्गावर लावण्यासाठी भगवे ध्वज आणि प्रसारानंतर कार्यालयात एकत्र जमणार्‍या कार्यकर्त्यांसाठी अल्पाहार विनामूल्य पुरवला.

२. श्री. धर्मेश पटेल यांनी धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी येणार्‍या कार्यकर्त्यांसाठी दोन दिवस विनामूल्य भोजनव्यवस्था करून दिली.

सभेत दिलेल्या वीरश्री निर्माण करणार्‍या घोषणा

१. वैदिक सनातन हिंदु धर्माचा विजय असो ।

२. भारतमातेचा विजय असो ।

३. पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ।

४. जय भवानी । जय शिवाजी ॥

५. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६. हिंदूंनो, जागे व्हा ! एक व्हा !

७. उठ भगिनी, जागी हो ! चंडी, दुर्गा, गार्गी हो !

८. हर हर महादेव ।

धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी १९ जानेवारीला आढावा बैठक

स्थळ : ॐ एंटरप्राइझेस, गंगावाडी, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, घाटकोपर (पश्‍चिम)

वेळ : रात्री ८    भ्रमणभाष : ९९६७४ ३६४४१, ९८३३४ ५१२४१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात