नवरात्रोत्सव आणि दीपावलीनिमित्त प्रवचनांच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा उपक्रम

देहली राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा आढावा

१. प्रवचन

नवरात्रोत्सव आणि दीपावली या विषयांवर देहलीच्या अलकनंदा विभागातील संतोषीमाता मंदिर, उत्तरप्रदेश राज्याच्या नोएडा येथील ‘डब्ल्यू ब्लॉक’मधील शिवमंदिर आणि नोएडा येथील मयुर विहार फेज ३ या ठिकाणी प्रवचने घेण्यात आली.

फरिदाबाद येथेही दुर्गापूजा सत्संग आणि कीर्तन मंडळ येथे ८ प्रवचने करण्यात आली. या जवळजवळ २५० जिज्ञासूंनी प्रवचनांचा लाभ घेतला. जिज्ञासूंना हा विषय अतिशय आवडला.

२. ग्रंथप्रदर्शन

२ अ. नोएडा, उत्तरप्रदेश

रामलीला उत्सवामध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अन्य एका ठिकाणी प्रवचनासह प्रदर्शनही लावण्यात आले. शरद पौर्णिमेनिमित्त शनीपीठ मंदिर, सेक्टर १४ येथे सनातनच्या ६ साधकांनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले.

– कु. मनीषा माहुर आणि सौ. तृप्ती जोशी