सनातनकडून हुबळीच्या ‘एफ् एम् रेडिओ’वरून मकरसंक्रातीविषयी मार्गदर्शन

हुबळी (कर्नाटक) : मकरसंक्रांतीचे महत्त्व सांगण्यासाठी येथील एफ् एम् रेडिओवरून सनातन संस्थेच्या वतीने प्रसार करण्यात आला. मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व अन् कृती इत्यादी माहितीचा यांत अंतर्भाव होता. सनातनच्या साधिका सौ. विदुला हळदीपूर यांनी रेडियोवरून यासंदर्भात मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात