थायलंडमध्ये पुरामुळे १२ जणांचा मृत्यू !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

thailand_flood

नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (थायलंडमध्ये पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला, तर ७ लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

बँकॉक : थायलंडमध्ये पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला, तर ७ लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. तसेच रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक यांवर परिणाम झाला आहे. लोक पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी वाहनांच्या टायरचा वापर करत होते. थायलंडच्या नौदलाकडून साहाय्यता कार्य करण्यात येत आहे. वर्ष २०११ मध्ये अशाच प्रकारे आलेल्या पुरामध्ये सहस्रो लोक बेघर झाले होते, तर ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात