काही काळजी करू नका, रामराज्य येणारच आहे !

  • फरांदवाडी (जिल्हा सातारा) येथे प.पू. कानिफनाथ महाराज यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा !
  • प.पू. कानिफनाथ महाराज यांचे सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

फरांदवाडी (जिल्हा सातारा) : येथे जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाने अनंत श्रीविभूषित जगद्गरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांचा प्रवचन आणि दर्शनसोहळा १ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता फरांदवाडी या गावात आयोजित केला होता. या वेळी प्रवचनानंतर दर्शन कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. आशिष कापसे आणि उदय ओझर्डे यांनी त्यांना आम्ही सनातन संस्थेच्या वतीने आलो आहोत, असे सांगितले. त्या वेळी श्री. आशिष कापसे यांच्या डोक्यावर हात ठेवत प.पू. कानिफनाथ महाराज म्हणाले, रामालाही त्या वेळी अडचणी आल्या होत्या. पण नंतर त्यांनी रामराज्य निर्माण केले. आताही तसेच आहे. अडचणी येणार आहेत; पण नंतर रामराज्य येणार आहे, काही काळजी करू नका.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात