अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

pradarshan

इंदूर (मध्यप्रदेश) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने येथे ६२ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशन स्थळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्र आणि धर्मविषयक ग्रंथ तसेच धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अधिवेशनाला देशभरातील १० सहस्रांहून अधिक युुवक-युवतींनी भाग घेतला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात