मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी सनातन संस्था करत असलेले कार्य !

marathila_jivant_theva_chitra1_c-282x320

‘इंग्रजी भाषा शिकण्यापायी वर्षेच्या वर्षे फुकट जातात आणि धर्मासंबंधाचे ज्ञान ‘शून्य’ मिळते’, असे शिक्षण क्षेत्रातील इंग्रजीच्या घुसखोरीविषयी परखड विचार लोकमान्य टिळकांनी १९०८ मध्ये व्यक्त केले होते. आता १०९ वर्षांनंतर परिस्थिती फारच भीषण झाली आहे. महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्र, न्यायपालिका, प्रशासन आदी सर्वच क्षेत्रांत मराठीला एका कोपर्‍यात ढकलून इंग्रजीने वर्चस्व प्राप्त केले आहे. मराठी भाषेवरील ही आक्रमणे परतवून लावण्यासाठी व्यापक जनप्रबोधन होणे आवश्यक आहे. यासाठी मराठी भाषेविषयीचे विशेष लिखाण आमच्या वाचकांसाठी प्रतिदिन प्रसिद्ध करत आहोत.

राष्ट्राभिमान विसरणे

 इंग्रजीचा आग्रह हा राष्ट्रीय वृत्तीच्या अभावाचे लक्षण !

‘पुन्हा पहिल्यापासून विचार करूया की, माणसाला इंग्रजी किती लागते ? जी फार मोठी आणि असाधारण प्रवृत्तीची माणसे असतात, त्यांची इंग्रजीची भूकही पुष्कळ मोठी असते. ती भागवण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते. हे लोक आठवीपासून इंग्रजी शिकले, तरी त्यांचे काही बिघडत नाही; पण सर्वसामान्य माणसांना उदरनिर्वाहापुरतेच इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असते. अशी माणसे समाजात ७० ते ७५ टक्के असतात; पण त्यांना पोटापुरते इंग्रजी लागणार आहे, हे ठाऊक असूनही आपण त्यांना त्यासाठी मराठीला घराबाहेर काढायला भाग पाडतो. हे पाप आहे. मुसलमानांच्या दास्यात एक सहस्र वर्षे आणि इंग्रजांच्या दास्यात दीड-दोनशे वर्षे काढल्याने आपली सांस्कृतिक अस्मिता अन् राष्ट्रीय प्रवृत्ती यांवर फार मोठा आघात झाला आहे. तो घाव अजून भरलेला नाही. राष्ट्रीय बाण्याने चैतन्यशील व्हावे; म्हणून आपल्यावर गुणकारी औषधयोजना व्हायला हवी. त्याकडे गेली ६० वर्षे दुर्लक्ष झाले. आता ज्या मातृभाषेच्या उबदार संगतीने आपण त्यातल्यात्यात आस्थेवाईक जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत, तो आधारच आपल्या हातून हिसकावून घेतला जात आहे आणि आपल्याला इंग्रजीच्या दावणीला बांधले जात आहे.

सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. ‘आपल्या मुलांनी जन्मतः आक्रंदावे, तेही इंग्रजी भाषेत’, असे बहुतेक मातांना वाटत आहे. राष्ट्रीय वृत्तीच्या अभावाचे हे लक्षण आहे. ‘आपलं पोरगं मराठीतून शिकलं, तर ते पोटापाण्याला लागणार नाही’, अशी जणू सगळ्यांना निश्‍चिती आणि भीती आहे. केवढा हा मराठीचा अपमान ! मातृभाषेच्या क्षमतेवर विश्‍वास नसेल आणि ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवले, त्यांच्या भाषेच्या आधारावाचून जगता येणार नाही, असा न्यूनगंड डोक्यावर घेऊन आपण जगणार असू, तर मग आपण स्वतंत्र तरी कशासाठी झालो ?’

– श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

भाषाभिमानशून्य देश रसातnळाला जातो !

मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांनी त्यांच्या नावाच्या पाट्या आणि आद्याक्षरे मराठी भाषेतच लिहिली पाहिजेत’, असा आदेश महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९६१ मध्येच काढला होता. आज ४५ वर्षे होऊन गेली, तरी शासनानेेच केलेले नियम मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी पाळत नाहीत, हे जनतेसमोर आले. गेल्याच मासात (ऑगस्ट २००६) गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील, तसेच राज्याचे मुख्य सचिव श्री. दे.कृ. शंकरन् यांनी लावलेल्या त्यांच्या इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्यांविषयी श्री. दिवाकर रावते यांनी त्यांना उत्तर (जाब) विचारले होते.’

भारतात बहुतांशी शाळांत इंग्रजी ही
शिक्षणाच्या माध्यमाची भाषा झाल्याने देशाचा विकास खुंटणे

‘इंग्रजी एक विदेशी भाषा आहे; पण बहुतांशी शाळांमध्ये ती माध्यमाची भाषा आहे. त्यामुळे त्या भाषेत आपले विचार प्रकट करण्यासाठी विद्यार्थ्याला ती भाषा समजून घ्यावी लागते. असे करण्यापेक्षा तो विचार (जे त्याचे नसून लेखकाचे किंवा शिक्षकाचे असतात. पाठ करून व्यक्त करतो. त्यामुळे विद्यार्थ्याचे चिंतन मंदावते. त्याचा भाषिक विकास खुंटतो. त्याची विचारअवस्था पोपटाप्रमाणे बनते. काही शिक्षणतज्ञ असे मानतात की, विदेशी भाषेच्या माध्यमातून देशाचा विकास कधीच होऊ शकत नाही; म्हणूनच इंग्रजी भाषेमुळे भारताच्या विकासाचा वाव खुंटला आहे. इंग्रजीसारख्या विदेशी भाषेच्या माध्यमामुळे राष्ट्रीय चरित्राचा विकास कदापी शक्य नाही.’)

– डॉ. विजयकुमार पाटणेकर, गोवा. (‘नवप्रभा’, १६.९.१९९९)

इंग्रजीचे वर्चस्व राखणार्‍या भारताच्या शिक्षणपद्धतीमुळे देशातील तरुणांच्या मनात देशभक्तीविषयी उदासीनता असणे, तर मदरशांमधून जिहादी प्रवृत्ती वाढवण्यात येणे

‘इंग्रजीचे वर्चस्व राखणार्‍या भारताच्या शिक्षणपद्धतीमुळे देशातील तरुणांच्या मनात देशभक्ती, त्याग, बलीदान आणि कर्तव्य यांविषयी उदासीनताच दिसून येते. याच्या उलट मदरशांमधून चालू असलेल्या शिक्षणपद्धतीद्वारे मुसलमानांमध्ये हिंदूंना नष्ट करण्याची जिहादी प्रवृत्ती वाढवण्यात येत आहे. यामुळेच आज भारताचा कोणताही भाग पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या (दहशतवाद्यांच्या) आक्रमणापासून सुटलेला नाही.’

(संदर्भ : अज्ञात)

१ ई ६ अ. ‘भारतामध्ये मदरशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि गुरुकुले मात्र समाप्त होत आहेत.’

(संदर्भ : अज्ञात)