सुळ्या (कर्नाटक) येथील हिंदु धर्मजागृती सभा

1
डावीकडून सौ. मंजुला गौडा, कु. रेवती मोगेर, दीपप्रज्वलन करतांना स्वामी श्री. योगेश्‍वरानंद सरस्वती आणि श्री. चंद्र मोगेर

सुळ्या (कर्नाटक) : विश्‍वशांतीसाठी हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचे अध्ययन करा, असे आवाहन सुळ्या येथील चैतन्य आश्रमाचे स्वामी श्री. योगेश्‍वरानंद सरस्वती यांनी येथे हिंदु धर्मजागृती सभेत बोलतांना केले. ‘सनातन धर्म म्हणजे जात नाही, तर ती जीवन जगण्याची एक उत्तम व्यवस्था आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुळ्या तालुक्यामध्ये श्री हरिहरेश्‍वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. योगेश्‍वरानंद सरस्वती यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंजुला गौडा, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर आणि रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर यांनीही मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात