सनातन संस्थेच्या वतीने सूरतगड (राजस्थान) येथे केंद्रीय पोलीस दलाच्या पोलिसांना मार्गदर्शन

rajasthan2-480x191
मार्गदर्शनाचा लाभ घेतांना केंद्रीय पोलीस दलाचे पोलीस

जयपूर (राजस्थान) : सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमधील सूरतगड येथील रंगरूट पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नुकतेच साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा २५३ केंद्रीय पोलीस दलाच्या पोलिसांनी लाभ घेतला. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. किरण नोगिया यांनी अध्यात्माचे मुलभूत सिद्धांत, गुरूंचे महत्त्व, पितृदोषामागील कारणे आणि निवारण इत्यादी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्राचे प्राचार्य श्री. गिरीश कुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात