हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या सोशल मीडिया प्रसाराचा ऑक्टोबर अन् नोव्हेंबर २०१६ मधील आढाव

हिंदूंंना धर्मशिक्षण देणे, हिंदूंवर होणार्‍या आघातांची वस्तुनिष्ठ माहिती देणे, धर्माचे होत असलेले विडंबन रोखणे, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक अन् ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांचा प्रभावी वापर करून हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे.

१. व्हॉट्स अ‍ॅप प्रणालीद्वारे झालेला प्रसार

1व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा करणार्‍या धर्माभिमान्यांच्या संख्येत १०८ ने वाढ झाली असून सध्या एकूण ४७६ धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत. या प्रणालीद्वारे धर्मशास्त्र, हिंदूंवरील आघाताच्या वार्ता, तसेच सण, धार्मिक उत्सव यांमागील धर्मशास्त्र दर्शवणारी चलत्चित्रे (व्हिडीओ) नियमित पाठवले जातात. याअंतर्गत जागो हिंदू या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून धर्मशिक्षण आणि आघातांविषयी देण्यात येणारी माहिती प्रतिदिन २ लक्ष ५९ सहस्र धर्माभिमानी हिंदूंपर्यंत सध्या पोचत आहे. मागील २ मासांंत (महिन्यांत) या संख्येत ९९ सहस्रने वाढ झाली आहे आणि समाजाकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२. फेसबूक प्रणालीद्वारे झालेला प्रसार

2सध्या फेसबूकच्या माध्यमातून एकूण २७४ धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पानाची सदस्यसंख्या मागील २ मासांत (महिन्यांत) १ लक्ष ४० सहस्रने वाढून आता १२ लक्ष ४० सहस्रपर्यंत पोचली. सनातन संस्थेच्या फेसबूक पानाची सदस्यसंख्या २ सहस्र ८५५ ने वाढून १९ सहस्र ३२६ लोकांपर्यंत पोचली. समितीच्या फेसबूक पानांच्या माध्यमातून एकूण ६५ लक्ष, तर सनातन संस्थेच्या फेसबूक पानाच्या माध्यमातून २ लक्ष ४० सहस्रहून अधिक लोकांपर्यंत विषय पोचला. मागील २ मासांत (महिन्यांत) समितीची अजून नवीन ५ जिल्हास्तरीय पाने चालू झाली असून आता एकूण ३५ जिल्हास्तरीय फेसबूक पाने सध्या सक्रीय आहेत आणि या पानांच्या माध्यमातून ही माहिती १ लक्ष ६२ सहस्र हिंदूंपर्यंत पोचत आहे. यामध्ये मागील २ मासांत १ लक्ष ९ सहस्र १९० ने वाढ झाली आहे.

३. ट्विटर प्रणालीद्वारे झालेला प्रसार

3सध्या ट्विटर प्रणालीच्या माध्यमातून एकूण ३७६ धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत. त्यांच्या माध्यमातून १२ लक्ष ५२ सहस्र ८६८ लोकांपर्यंत विषय पोचला. यामध्ये मागील २ मासांत (महिन्यांत) ९ लक्ष ११ सहस्र ७७५ ने वाढ झाली आहे. समितीच्या अधिकृत अकाउंट ट्विटर खात्यामधून (@hindujagrutiorg) ५ लक्ष ८१ सहस्र ८०० लोकांपर्यंत या मासात (महिन्यात) विषय पोचला आणि फॉलोअर्सच्या संख्येत १ सहस्र २९५ ने वाढ झाली, तसेच सनातन संस्थेच्या अधिकृत अकाउंट ट्विटर खात्याद्वारे (@SanatanSanstha) १ लक्ष ८ सहस्र लोकांपर्यंत या मासात (महिन्यात) विषय पोचला आणि फॉलोअर्सच्या संख्येत ५४९ ने वाढ झाली.

४. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते
यांच्यावर केल्या जाणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
हिंदु धर्माभिमान्यांनी केलेल्या ट्रेंड्सना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अ. १.१०.२०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला १४ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने समितीचे धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांचे कार्य सर्वत्र पोचावे, यासाठी #14YearsOfHJS या विषयावर ट्विट्स करण्यात आल्या. हा विषय १५ लक्ष ३० सहस्र १६१ जणांपर्यंत पोचला.

आ. १२ आणि १६.१०.२०१६ या दिवशी काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणे आणि पनून कश्मीरची मागणी, यांसंदर्भात जागृती व्हावी, यासाठी #ChaloKashmir अन् Kashmiri Hindus यावर ट्विट्स करण्यात आल्या. हा विषय अनुक्रमे ३३ लक्ष ४ सहस्र ५४६ आणि ८७ लक्ष ७२ सहस्र ६०८ जणांपर्यंत पोचला.

इ. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा धर्मद्रोही निर्णय कर्नाटक सरकारने घेतला होता. याला विरोध करण्यासाठी आणि याविषयी जागृती करण्यासाठी #TipuJayanti यावर ट्विट्स करण्यात आल्या.

५. विषय (Hashtag) किती लोकांपर्यंत पोचला ?

pg7_table-1-480x196

टीप : #TipuJayanti याविषयी ट्विटरवरील अनेक लोकांनी यात सहभाग घेतलेला असल्याने हा विषय सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांपैकी (ट्रेंड्सपैकी) एक होता. यामध्ये समितीने काही ट्विट्स केल्या होत्या. त्यामुळे हा विषय नक्की किती लोकांपर्यंत पोचला ?, याचा आकडा उपलब्ध नाही.

६. सोशल मीडियाद्वारे सेवा करणार्‍या नवीन धर्माभिमान्यांसाठी शिबिराचे आयोजन

६.११.२०१६ या दिवशी संपूर्ण भारतातील सोशल मीडियाद्वारे सेवा करणार्‍या नवीन धर्माभिमान्यांसाठी स्काईप प्रणालीच्या माध्यामातून एक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ट्विटर, फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅप प्रणालीचा वापर करून धर्मप्रसार कसा करावा ? या विषयी माहिती देण्यात आली. याचा लाभ १७८ नवीन धर्माभिमान्यांनी घेतला.

– सोशल मीडिया समन्वय कक्ष, रामनाथी, गोवा. (२९.११.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात