धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

१. सनातन संस्था आणि हिंदु
जनजागृती समिती यांच्याशी जोडलो
गेल्यावर हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय कळले !
– प्रभाकर भोसले, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी

prabhkar-bhosale_shivkarya-pratishthan-1आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन मिळाले. आम्ही धर्मकार्य करत होतो; मात्र आम्हाला नेमकी दिशा नव्हती. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी जोडलो गेल्यावर मला हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय कळले. समितीच्या माध्यमातून मला धर्मशिक्षण मिळाले, असे प्रतिपादन श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले यांनी केले.

श्री. प्रभाकर भोसले यांनी धर्महानी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न

१. विक्रोळी भागात एका ठिकाणी वर्षातून एकदा शिवजयंती साजरी करण्यात येत होती. श्री. भोसले यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी नियमित शिवपूजन चालू केले.

२. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटाराचे काम करण्याविषयी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांना सांगूनही होत नव्हते. हे काम श्री. भोसले यांनी पाठपुरावा घेऊन पूर्ण करून घेतले.

३. या भागातून निघणार्‍या मुसलमानांच्या जुलुसाच्या वेळी धर्मांधांकडून आरडाओरडा करणे, छेडछाड करणे, रस्ता अडवणे असे अपप्रकार करण्यात येत होते. याविरोधात श्री. भोसले यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धर्मांधांच्या गैरकृत्यांना आळा घातला.

४. मंत्रालयाच्या भिंतीवर लावलेले गोमातेचे चित्र संबंधितांच्या लक्षात आणून देऊन श्री. भोसले यांनी ते काढले.

५. रेल्वेमध्ये प्रवास करत असतांना एक धर्मांध महिलांना धक्का मारण्याच्या हेतूने मार्गात उभा राहिला असल्याचे श्री. भोसले यांना लक्षात येताच त्यांनी धर्मांधाला खडसावून बाजूला हटवले.

 

२. मंदिराशी संबंधित बैठकीला प्रवेश
नाकारणार्‍या पोलिसांना ‘मंदिराशी संबंध
नसला, तरी त्यातील महादेव माझा आहे’, असे
बाणेदार उत्तर देणारे स्वराज्य हिंदू सेनेचे श्री. सुशील तिवारी !

sushil-tiwari_swarajya-hindu-senaकल्याण येथील श्री गंगेश्‍वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या नावाची मोठी कमान उभारण्यात आली. एकदा शिवरात्रीच्या कार्यक्रमानंतर मध्यरात्री धर्मांधांनी या कमानीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून पोलिसांत तक्रार केली. धर्मांधांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी मोठा फौजफाटा आणून कमान काढायला लावली. याविषयी पोलिसांनी एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला श्री. तिवारी गेले असता ‘मंदिर तुमचे आहे का ? बैठकीशी तुमचा काहीही संबंध नाही’, असे सांगून त्यांना रोखले. यावर श्री. तिवारी यांनी ‘‘मंदिर माझे नसले, तरी मंदिरातील भगवान शंकर माझे आहेत’’, असे बाणेदार उत्तर दिले. त्यानंतर त्यांना बैठकीत प्रवेश दिला. या वेळी पोलिसांनी कमानीच्या ऐवजी फलक लावण्याचा पर्याय ठेवला. याला श्री. तिवारी यांनी विरोध दर्शवला; मात्र काही बड्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी याला मान्यता दिली.

याविषयी श्री. तिवारी म्हणाले, ‘‘धर्माच्या नावावर व्यापार करणार्‍या लोकांपासून सावध रहावे. काही लोक आपल्यात राहून पोलिसांना बातम्या पुरवतात. धर्मासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या हिंदूंचे पाय खेचतात. अशा धर्माच्या नावावर व्यापार करणार्‍या लोकांपासून सावध रहावे.’’

 

३. ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू महिलांमध्ये
जागृती करणारे श्री. श्रीनिवास कोंगारी, भिवंडी

shrinivas-kongariभिवंडी भागात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे झाली आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे हिंदु युवती धर्मांधांच्या जाळ्यात अडकत असल्याचे श्री. निवास कोंगारी यांच्या लक्षात आले. याविषयी हिंदु युवतींना धर्मशिक्षण देण्याचा निश्‍चय श्री. कोंगारी यांनी केला. त्यानंतर ठिकठिकाणी जाऊन महिलांना एकत्र करून ते हिंदु धर्माचे महत्त्व सांगतात. ‘लव्ह जिहाद’च्या भीषण परिणामांची हिंदु महिलांना जाणीव करून देत आहेत.

सनातनशी संबंध आल्यावर आम्ही हिंदू एकत्र झालो !

याविषयी श्री. श्रीनिवास कोंगारी अधिवेशनात मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकतात’, हे आम्हाला हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून लक्षात आले. आमच्यामध्ये एकता नव्हती. सनातन संस्थेशी संबंध आल्यावर आम्ही हिंदू एकत्रित आलो. कधीही घोषणा न देणारे आम्ही हिंदुत्वाच्या घोषणा द्यायला लागलो.’’

 

४. पोलिसांच्या दबावाला बळी न पडता
अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कायदेशीर
कारवाई करणारे ‘जय हिंदुत्व’ संघटनेचे श्री. शिव यादव !

श्री. शिव यादव यांनी विरार भागातील मशीद आणि मदरसे यांवर असलेल्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या लढ्यासाठी त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे साहाय्य घेतले. या वेळी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून श्री. यादव यांच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना नोटीस देण्यात आली. पोलिसांच्या दबावाला बळी न पडता श्री. शिव यादव यांनी त्यांचा लढा खंबीरपणे चालू ठेवला. याविषयी मनोगत व्यक्त करतांना

श्री. शिव यादव म्हणाले, ‘‘नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव या वेळी पोलीस नियम दाखवतात; मात्र मशिदी अन् मदरसे यांवर वर्षभर चालू असलेल्या भोंग्यांवर कारवाई करत नाहीत. याला हिंदूंनी संघटित होऊन जाब विचारला हवा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात