हिंदूंनी त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवले, तेव्हा राष्ट्रद्रोही शक्तींचा नाश झाला आहे ! – कु. अनिता राणा, सनातन संस्था

फरीदाबाद (हरियाणा) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंची प्रतिज्ञा !

faridabad_2_c1
डावीकडून दीप्रज्वलन करतांना पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, श्री. दिगंबर रैना, कु. कृतिका खत्री आणि अधिवक्त्या चेतना शर्मा

फरीदाबाद (हरियाणा) : येथील सेक्टर २९ मधील काली बाडी मंदिराजवळ हिंदु जनजागृती समितीकडून २५ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांकडून हिंदु राष्ट्र आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच अशी सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ.चारूदत्त पिंगळे, हिंदू स्वाभिमानच्या अधिवक्त्या चेतना शर्मा, पनून कश्मीरचे श्री. दिगंबर रैना, सनातन संस्थेच्या कु. अनिता राणा आणि समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. कृतिका खत्री यांनी संबोधित केले. या वेळी मान्यवरांकडून हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या अ‍ॅण्ड्रॉईड सनातन हिंदी पंचांग २०१७ चे प्रकाशन करण्यात आले.

भारताचे इस्लामिक स्टेट होऊ द्यायचे नसेल,
तर हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे

पू. डॉ. चारूदत्त पिंगळे म्हणाले, देशात काश्मीरनंतर उत्तरप्रदेशातील कैराना, आजमगड येथून हिंदूंचे पलायन होत असतांना सत्ताधारी गप्प आहेत. येत्या दिवसांत धर्मनिरपेक्ष राज्य अथवा हिंदु राष्ट्र, असा प्रश्‍न नसणार, तर इस्लामिक स्टेटच्या भारतातील प्रवेशामुळे इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्‍न असणार आहे. यामुळे आपल्याला देशावर येणार्‍या जिहादी संकटाला समजून घेतले पाहिजे. आपल्याला भारताचे इस्लामिक स्टेट होऊ द्यायचे नाही, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची वैधानिक मागणी सतत करत रहायला हवी.

पुढील १० वर्षांत भारत हिंदु राष्ट्र असेल किंवा
हिंदुविहिन राष्ट्र असेल ! – अधिवक्त्या चेतना शर्मा

जर आपण इतिहासापासून काही शिकलो नाही, तर इतिहास पुनःपुन्हा त्याच घटना घडवतो. त्यामुळे जर आपण इतिहासापासून शिकलो नाही, तर पुढील १० वर्षांत भारत हिंदुविहिन राष्ट्र असेल आणि जर शिकलो, तर भारत हिंदु राष्ट्र होईल,असे प्रतिपादन अधिवक्ता चेतना शर्मा यांनी केले.

हिंदूंनी त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवले,
तेव्हा राष्ट्रद्रोही शक्तींचा नाश झाला आहे ! – कु. अनिता राणा

कु. अनिता राणा म्हणाल्या, जिहादी आतंकवाद म्हणजे केवळ हिंसाचार नाही, तर लॅण्ड जिहाद, मिनी पाक जिहाद, लव्ह जिहाद आदी प्रकारचे जिहाद चालू आहेत. आज हिंदूंना त्यांचे आणि त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी शौर्याचे, वीरतेचे दर्शन घडवणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंनी त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवले तेव्हा राष्ट्रद्रोही शक्तींचा नाश झाला आहे.

पनून कश्मीरचे श्री. दिगंबर रैना यांनी काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी सांगितले. कु. कृतिका खत्री यांनी हिंदूंना स्वसंरक्षण शिकवण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात