भाग्यनगर पुस्तक मेळ्यामधील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

bhagyanagar_stall-399x320
ग्रंथप्रदर्शन केंद्राला भेट देणारे जिज्ञासू

भाग्यनगर (हैद्राबाद) : येथे प्रतिवर्षी पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही १५ ते २६ डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २५०हून अधिक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात सनातन संस्थेकडूनही ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनच्या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या धर्मशिक्षणाचे फलक लक्षवेधी ठरले. त्याचा सहस्रो जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. येथे लावण्यात आलेल्या अन्य केंद्रांतील व्यक्ती सनातन संस्थेच्या केंद्रावर येऊन ग्रंथांचे कौतुक करत होत्या, तसेच आमच्या केंद्रावरही हे ग्रंथ ठेवून आम्ही त्यांचे वितरण करू, असे ते सांगत होते.

२. प्रतिवर्षी या मेळ्यास येणारे जिज्ञासू सनातनचेही ग्रंथप्रदर्शन पहात होते. त्यांनी या वर्षीही प्रदर्शनाला भेट दिली आणि तुमचे कोणते नवीन ग्रंथ आले आहेत का, अशी विचारणा केली.

३. आमच्या भ्रमणभाषमध्ये सनातन पंचागचे अ‍ॅप आहे, असे सांगत त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीचे ग्रंथ आहेत का, अशी विचारणाही अनेक जिज्ञासू करत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात