महिलांना आत्मबलसंपन्न बनवणे ही काळाची आवश्यकता ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

1
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

देशात १०० कोटी हिंदू असतांना हिंदूंच्याच देशात हिंदु स्त्री-पुरुष असुरक्षित झाले आहेत. त्याचसमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्या केल्या जात आहेत. आज अनेक महिला बस, बाजार यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी गुंड आणि समाजकंटक यांच्याकडून होणारे अश्‍लील बोलणे आणि छेडछाड हे केवळ लज्जा अन् भीडस्तपणा यांमुळे सहन करतात. आपण भर बाजारात अशा समाजकंटकांना त्याच क्षणी जाब विचारायला हवा, काहीतरी प्रतिकार करून चारचौघांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. महिलांनी स्वसंरक्षण विद्या शिकण्यासह प्रतिकारक्षमता वाढवणे आवश्यक आहे. महिलांना भावी काळात स्वतःचे आणि स्वतःच्या बांधवांचे रक्षण करायचे असेल, तर स्वसंरक्षण विद्या शिकणे आवश्यक आहे. असे झाले, तरच महिला ही आत्मबलसंपन्न होईल. आपण आज स्वसंरक्षण शिकलो, तरच उद्या इसिसच्या आतंकवाद्यांना तोंड देऊ शकू. कुटुंब, घर, गाव आणि राष्ट्र सुरक्षित राहिले, तरच आपण सुरक्षित राहू. देवीच्या मारक रूपांची धारणा करण्यासाठीच आम्ही हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा चालू केली आहे ! आज मी रणरागिणी शाखेच्या वतीने जाहीर करते की, आम्ही युवतींना निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ.

आज हिंदूंमध्ये शौर्याचे जागरण करणे अत्यावश्यक झाले आहे ! – पू. नंदकुमार जाधव

2
पू. नंदकुमार जाधव

देशात नियमित होणार्‍या बाँबस्फोटांनंतर आपण मेणबत्ती नव्हे, तर तो घडवून आणणार्‍या देशालाच नकाशावरून नष्ट करण्याची सिद्धता करायला हवी. सीमेवरील सैनिकांप्रमाणे देशाच्या अंतर्गतही सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता आहे, तरच हा देश आतंकवादमुक्त होईल. जीवनात अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार कधी करावा लागेल, ही वेळ सांगून येत नाही. यासाठी सतत आपले मन आणि शरीर प्रतिकारक्षम असले पाहिजे. हिंदु समाज आजपर्यंत सर्वत्र पराभूत होत आहे; कारण आम्ही आमच्यातील शौर्याचे जागरण केले नाही. शौर्याने ओतप्रोत भरलेला इतिहास असून तो आपल्याला आज शिकवला जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून जिहादी आतंकवादाचे संकट आपल्यासमोर आहे. सध्या हिंदु समाजाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही अजिंक्य शूरवीर नृसिंह आहोत, याचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे. हे सर्व रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंने स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवले पाहिजे. संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंमध्ये शौर्याचे जागरण करणे आवश्यक आहे. असे झाले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस वेळ लागणार नाही. यासाठी आपण सर्व जण प्रतिज्ञा करूया की, आम्ही शिवछत्रपतींचे मावळे होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तन-मन-धन आणि प्रसंगी प्राणपणाने लढू !

आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे प्रखर मार्गदर्शन !

3
आमदार श्री. राजासिंह ठाकूर

आज देश सैनिकांमुळे सुरक्षित आहे. हेच सैनिक देशावर येणारी पहिली गोळी स्वतःवर झेलतात. अशा सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यावर त्याविषयी संशय घेऊन नपुंसक नेत्यांकडून पुरावे मागितले जातात. ज्या देशद्रोही व्यक्ती आणि नेते यांना पुरावा हवा आहे, अशांमध्ये धैर्य असेल, तर त्यांनी १ मिनिटांसाठी सीमेवर उभे राहून दाखवावे. झेड सुरक्षा व्यवस्थेत फिरणारे नेते देशाचे रक्षण काय करणार ?

टिपू सुलतान हा क्रूरकर्मा असून त्यानेही अनेक हिंदूंच्या हत्या केल्या आहेत, तसेच हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले आहेत. अशा क्रूरकर्म्याची जयंती कर्नाटक शासनाने अधिकृतरीत्या साजरी करणे, हे लज्जास्पद आहे.

कर्नाटक आणि केरळ येथे ५०० हून अधिक हिंदू नेत्यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या  आहेत. पश्‍चिम बंगालमधील धुलगड येथे ४ दिवस केवळ हिंदूंच्या घरांनाच लक्ष्य करून जाळले जात आहे आणि हिंदूंना मारले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

आजच्या महिलेने जिजामाता आणि झाशीची राणी होऊन स्वतः, कुटुंब, समाज आणि धर्म यांचे रक्षण करायचे आहे. आपला देश आणि देशातील हिंदु हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच सुरक्षित आहे. त्यामुळे मातांनी जिजामातांचा इतिहास जाणून आपल्या घरातून छत्रपती शिवाजी महाराज सिद्ध केले पाहिजेत. आपल्या मुलींना लव्ह जिहादच्या विळख्यापासून रोखले पाहिजे.

भारतात रहाणार्‍यांनी भारतमाता की जय आणि वंदे मातरम् म्हणायलाच हवे. जर तुम्ही ते म्हणणार नसाल, तर तुम्हाला येथून पाकिस्तानात जावे लागेल. त्यासाठी भारतात रहाण्याची आवश्यकता नाही. आपल्याच देशात राहून देशाचे खाऊन देशाविरोधात बोलणार्‍यांपासूनच देशाला खरा धोका आहे.

लव्ह जिहादच्या माध्यमातून इस्लामिक स्टेट बनवणे, हे धर्मांधांचे लक्ष्य आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत हिंदु अल्पसंख्यांक, तर धर्मांध हे बहुसंख्यांक होतील.

आजच्या परिस्थितीत भ्रमणध्वनी संचामधील खेळ खेळणारा हिंदु युवक अपेक्षित नसून देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जिहादी आतंकवादी अन् धर्मांध यांच्या विरोधात लढणारा हिंदु युवक हवा आहे.

सद्यस्थितीत गोवंश रक्षण आणि संवर्धन यांची आवश्यकता आहे. गोमाता वाचली, तर देश वाचेल. गोमातेची सेवा हे पुण्यकर्म असून जीवनात एकदा तरी गोवंश वाचवा. त्यातून तुमच्या जीवनाचे सार्थक होईल.

श्री. सुनील घनवट यांनी जागवली स्थानिक हिंदूंमध्ये हिंदुत्वाची चेतना !

4
श्री. सुनील घनवट

केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक करून आतंकवाद्यांना कंठस्नान घातले; परंतु त्यानंतरही आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात अनेक सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सरकारने एक सर्जिकल स्ट्राईक असा करावा की, पाकिस्तान नकाशावरून नष्ट झाला पाहिजे.

काश्मीरमध्ये आतंकवादी बुरहान वाणी आणि अफझल यांच्या अंत्ययात्रेत बुरहान आणि अफझल घराघरातून येतील, अशा घोषणा देण्यात येणार असतील, तर धर्मांधांनी हेही लक्षात ठेवावे की, आमच्याही घराघरांतून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर येतील.

राज्य सरकार मुंबईमध्ये अरबी समुद्रात शिवस्मारक सिद्ध करत असून त्यासाठी ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत आहे; पण गेल्या १९ वर्षापासून भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी अनुमती मिळत नाही, हे मोठे दुर्दैव असून त्यासाठी कोणीही राजकारण करायला नको. शिवछत्रपतींचे असे स्मारक उभारतांना शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा देणार्‍या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे.

येथून पुढे २५ डिसेंबर हा नाताळ दिवस म्हणून न ओळखता भगवा दिवस म्हणून ओळखला गेला पाहिजे. तसेच नववर्षाचे आगमन म्हणून ३१ डिसेंबर हा गावागावात साजरा केला जाणार नाही, तर गुढीपाडवा हे नववर्ष म्हणून साजरे केले जाईल.

जळगावमध्ये यंदाच्या वर्षी धर्मद्रोही अशास्त्रीय मूर्तीदान मोहीम राबवली गेली. मूर्तीदान घेतलेल्या गणेशमूर्ती या पुन्हा तलावामध्येच विसर्जित करण्यात आल्या. शासनाकडून हे सर्व करत असतांना त्या गणेश मूर्तीचे विडंबन झाले. येथून पुढे जळगाववासिय हिंदूंच्या देवतांचे असे विडंबन सहन करणार नाही आणि मूर्तीदान न करता शास्त्रोक्त पद्धतीनेच गणेशमूर्ती विसर्जित करतील.

जळगावमधील राष्ट्रवादीच्या एका कार्यकत्याने रायगडावर जाऊन मद्यपान करत धिंगाणा केला. यातून राष्ट्रवादीची संस्कृती काय आहे, हे सर्वांसमोर आले.

मलकापूर येथे झालेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांना साहाय्य करण्यासाठी गेलेल्या हिंदू युवकांवरच पोलिसांनी कारवाई केली. हा कोणता न्याय झाला ?

भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचे कुटुंब यांची सामाजिक स्तरावर छी-थू होईल, यासाठी त्यांच्या घराजवळ भित्तीपत्रक लावण्याचे नियोजन करा. यामुळे ते पुढे भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत. त्यासाठी आवश्यकतेनुसार अधिवक्त्यांचे साहाय्य घेऊया आणि भ्रष्ट व्यवस्थेला आपण संघटितपणेच पालटूया.

सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रकाशन !

13_grantha-pradarshan

या वेळी सनातनने प्रकाशित केलेल्या विकार निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय भाग – १ आणि विकार निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय भाग – २ या मराठी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, पू. नंदकुमार जाधव, आमदार श्री. राजासिंह ठाकूर, श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते करण्यात आले.

भाग्यनगरचा वाघ आला ।

tutari320

धर्मांधांना धडकी भरवण्या भाग्यनगरचा वाघ आला ।

१५ मिनिटांचा हिशोब ज्याने सेकंदामध्ये दिला ॥

श्रीरामाच्या शोभायात्रेत ज्याच्यामुळे

अधर्मियांच्या इमारती झाकल्या ॥

एकटा असून ज्याने

मावळ्यांचा महासागर रचला ॥

धर्मांधांना धडकी भरवण्या

असा भाग्यनगरचा वाघ आला ।

१५ मिनिटांचा हिशोब ज्याने सेकंदामध्ये दिला ॥

हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही ।

hindu_rashtra

हिंदूंमध्ये शौर्य चेतनेचे कार्य करणार आम्ही ।

शौर्याने हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही ।

येतील कितीही अडथळे ।

येतील आडवी पुरोगामी बांडगुळे ॥

कर्कश ओरडतील अधर्मी कावळे ।

नाही झुकणार आम्ही ॥

आमुचे आदर्श छत्रपती शिवराय ।

असला शत्रू जरी महाकाय ॥

शौर्याने हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही ।

शौर्याने हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही ॥

14_sanatan-prabhat-kash
सनातन प्रभातचा कक्ष पहातांना जिज्ञासू !
35_pradarshan-pahatana-jidnyasu
प्रदर्शन कक्ष उत्सुकतेने न्याहाळणारे धर्माभिमानी !

हिंदु जनजागृती समितीविषयी पोलिसांना असलेला विश्‍वास !

एका पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने समितीच्या कार्यकर्त्याला सांगितले, समितीच्या कार्यक्रमात सर्वजण शिस्तीत येतात आणि जातात. त्यांच्या कार्यक्रमात कधीही वाद झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही जे वाद घालतात, त्यांच्यासाठी आम्ही आहोत.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमाचा आम्हाला ताण येत नाही !

अन्य एका कार्यकर्त्याशी बोलतांना त्या पोलीस निरीक्षकाने सांगितले, तुमच्या कार्यक्रमांचा आम्हाला फार ताण घ्यावा लागत नाही, असे मी आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सांगितले आहे. ३ सहस्र जणांचा मोर्चा जरी असला, तरी सर्व शिस्तबद्ध असते.

हिंदुत्वनिष्ठांना धर्मसभेच्या प्रसाराच्या वेळी देण्यात
आले होते हिंदु राष्ट्राचे प्रतीक म्हणून ध्वज आणि श्रीफळ !

जळगाव धर्मसभेचे निमंत्रण देतांना यंदाच्या वर्षी ८० गावांमध्ये धर्माभिमान्यांना हिंदु राष्ट्राचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज आणि श्रीफळ देण्यात आले. हिंदु राष्ट्राचा भगवा ध्वज सन्मानपूर्वक मिळल्याने हिंदुत्वनिष्ठांमध्ये विलक्षण उत्साह होता. आई श्री भवानीदेवीच्या चरणस्पर्श झालेले श्रीफळ मिळाल्याने धर्मजागृती सभेला जाणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे, असा मानस अनेकांनी समितीच्या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केला. हिंदुत्वनिष्ठ आपल्याही असा भगवा ध्वज आणि श्रीफळ हे कधी मिळणार, याची वाट पहात होते.

सभेनंतरच्या आढावा बैठकीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

aadhwa-baithak

सभेनंतर सभेतील वक्त्यांसमवेत धर्माभिमान्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याला ४०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

या वेळी अनेक धर्माभिमान्यांनी गोहत्या रोखणे, गावामध्ये बांधल्या जाणार्‍या अवैध मशिदींचे बांधकाम रोखणे, क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या जयंतीच्या वेळी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होणे याविषयी सनदशीर मार्गाने कसा विरोध करता येईल, हे जाणून घेतले. अनेकांनी आपल्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणीही केली. याचसमवेत आढावा बैठकांच्या माध्यमातून एकत्र येऊन कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात