भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील अध्यात्म आणि सेवा जत्रेमध्ये सनातन संस्थेकडून धर्मप्रसार !

bhubaneshwar_prasar
प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

राऊरकेला (ओडिशा) : हिंदु स्पिरिच्युअल सर्व्हीस फेअरच्या वतीने १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत भुवनेश्‍वर येथील बरमुंडा मैदानामध्ये अध्यात्म आणि सेवा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुमाने ७० संस्थांनी त्यांचे प्रदर्शन केंद्र लावले होते. सनातन संस्थेद्वारे अध्यात्म, राष्ट्र अन् आरोग्यविषयक ग्रंथ, तसेच सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्र आणि धर्मविषयक फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. या कालावधीत राष्ट्र आणि धर्मविषयक ध्वनीचित्रफीती प्रोजेक्टरद्वारे दाखवण्यात येत होत्या. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासू, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रात काम करणार्‍यांनी आवर्जून भेट दिली. फलक प्रदर्शन आणि ध्वनीचित्रफिती पाहून राष्ट्र आणि धर्मविषयक अनेक सूत्रे जिज्ञासूंनी जाणून घेतली.

क्षणचित्रे

१. आयोजकांपैकी काही कार्यकर्त्यांनी सर्व प्रदर्शन केंद्रांमध्ये सनातनच्या केंद्रावर सातत्याने मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते, असे प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सांगितले.

२. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील ब्राह्मणांपैकी एक श्री. विचित्रानंद मिश्रा यांनी सर्व ध्वनीचित्रफिती आवर्जून पाहिल्या. काही जिज्ञासूंना ते प्रदर्शन केंद्रावर घेऊन आले. त्यांनीही या ध्वनिचित्रफिती पाहिल्या आणि आध्यात्मिक ग्रंथ घेतले.

३. डॉ. पंडा (रेडिओलॉजिस्ट) यांनी ग्रंथांतील इतक्या विविध विषयांवरील माहिती कशी संकलित करण्यात आली, याविषयी चर्चा करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी जिज्ञासेने माहिती जाणून घेतली आणि काही ग्रंथही खरेदी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात