नवी मुंबई येथे बांधकाम व्यवसाय विषयक प्रदर्शनात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

नवी मुंबई : येथील बांधकाम व्यवसाय विषयक (प्रॉपर्टी) प्रदर्शनात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि वितरण कक्ष लावण्यात आला आहे. ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत सिडको मैदान, वाशी येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत आहे. सनातनच्या प्रदर्शन आणि वितरण कक्षाचा क्रमांक एच् २३ असून आयोजकांकडून विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात