धर्म हाच चांगल्या समाजाचे प्रेरणास्थान असतो : सौ. शीला नारायण, सनातन संस्था

कुडूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

kudur_c

कुडूर (कर्नाटक) : जगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे. या देशातील प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे. जोपर्यंत आपण राष्ट्र, धर्म आणि भाषा यांविषयी जागृत होत नाही, तोपर्यंत त्यांवरील आक्रमण चालूच राहील, असे उद्गार कर्नाटकच्या शिवगंगा क्षेत्र, मगडी येथील वीरसिंहासन संस्थान मठाचे श्री. शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडूर, मगडी येथील श्री कन्निका परमेश्‍वरी मंदिराच्या मंडपात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत महास्वामी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीधर आचार आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा उपस्थित होत्या.

या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण म्हणाल्या, ‘‘धर्म हाच चांगल्या समाजाचे प्रेरणास्थान असतो. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्‍वर करतो.’’

‘धर्माचरण केल्यास लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या समस्यांना हिंदू बळी पडणार नाहीत’, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा यांनी काढले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीधर आचार यावेळी म्हणाले, ‘‘देशात राष्ट्र आणि धर्म यांच्यावर विविध आघात होत आहेत. या समस्यांवर हिंदु राष्ट्र हाच उपाय आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात