फरिदाबाद नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना कर्मयोग विषयावर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

फरिदाबाद (हरियाणा) : गीता जयंतीच्या निमित्ताने येथील नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांसाठी कर्मयोग या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित करतांना भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाच्या सिद्धांताचा आपल्या जीवनात असलेला संबंध स्पष्ट केला. सनातन संस्थेच्या सौ. संदीप कौर यांनी धर्माचे महत्त्व आणि त्याचे आपल्या जीवनात असलेले महत्त्वाचे स्थान यांविषयी माहिती दिली. यासमवेतच प्रत्येक कृती करतांना नामजप करणे का आवश्यक आहे, याविषयीही सांगितले.

या कार्यक्रमाला फरिदाबाचे उपायुक्त चंद्रशेखर, नगरपालिकेच्या आयुक्त सौ. सोनल गोयल, पालिकेचे उपायुक्त महावीर प्रसाद, ब्रह्मकुमारीच्या पूनमदीदी आणि उषादीदी, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. संदीप कौर आदी उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात