देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

anant_geete_c
डावीकडून श्री. कार्तिक साळुंके, श्री. अभय वर्तक आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते

देहली : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांविषयी अवगत करण्यात आले. यावर त्यांनी शिवसेनेचे खासदार हे विषय संसदेत नक्की मांडतील, असे आश्‍वासन दिले. या प्रसंगी त्यांना सनातन पंचांग २०१७ भेट देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात