सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र मोहिमेचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा आढावा

सांगली जिल्हा 

अ. दुर्गादौडीचे स्वागत : श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणार्‍या दुर्गादौडीचे मिरज येथील श्री अंबाबाई मंदिर आणि सांगली येथील श्री अंबामाता मंदिर, येथे रणरागिणी शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. रणरागिणी शाखेच्या काही महिलांनी औक्षण करून घोषणा देत या दौडीचे स्वागत केले.
३ आ. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात दैनिक सनातन प्रभातचे अनेक वर्गणीदार वाढले.
– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका (२१.१०.२०१६)

 

पुणे जिल्हा

१. नवरात्रोत्सवातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी निवेदन देणे

नवरात्रोत्सवातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी १३ पोलीस ठाणी, पोलीस आयुक्त आणि २८ नवरात्रोत्सव मंडळे यांना निवेदने देण्यात आली.

२. पथनाट्य 

अ. राजेश्‍वरी महिला संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्ष सौ. निवेदिता बडदे यांनी पुढाकार घेऊन ३ ठिकाणी ऊठ भगिनी जागी हो ! या पथनाट्याचे आयोजन केले. सौ. बडदे यांना साधना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले, मला तुमच्या कार्यात सहभागी व्हायला आवडेल. तुमच्या संपर्कात आल्यापासून मला चांगले वाटत आहे.
आ. सौ. मृणाल पटवर्धन या मनसे महिला शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वत:हून १६.१०.२०१६ या दिवशी मनसेच्या कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखवण्यास बोलावले. त्यांच्या संपर्कात २५ महिला बचत गट आहेत.

३. सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ, देवतांची चित्रे आणि सनातन पंचांग
यांच्या वितरणात धर्माभिमानी अन् जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त सहभाग 

अ. शहरातील कापड दुकानदार आणि विज्ञापनदाते यांनी नवरात्र अन् दिवाळीच्या काळात साड्यांच्या खरेदीसाठी येणार्‍यांना भेट देण्यासाठी देवीची लहान ६५० लॅमिनेेटेड चित्रेे घेतली.
आ. श्री. अशोक नहार यांनी १०० मराठी आणि १०० हिंदी सनातन पंचांगे घेतली.
ई. चार दुकानदारांनी रांगोळीचे ४५० लघुग्रंथ भेट देण्यासाठी घेतले.

४. अनेक ठिकाणी महिलांसाठी
धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी आली आहे.

– श्री. अभिजीत देशमुख, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, पुणे जिल्हा. (२१.१०.२०१६)

 

लव्ह जिहादविषयी करत असलेली जागृती योग्यच
असून आता तसेच घडत असल्याचे धर्माभिमान्यांनी सांगणे

गेली अनेक वर्षे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था लव्ह जिहादविषयी करत असलेली जागृती योग्यच असून आता तसेच घडत असल्याचे धर्माभिमान्यांनी सांगणे
कवठे महांकाळ येथे लव्ह जिहादचे प्रकरण घडल्यानंतर समाजातील काही धर्माभिमान्यांनी लव्ह जिहादचे ५० ग्रंथ समाजात वितरित करण्यासाठी घेतले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था लव्ह जिहादविषयी गेली अनेक वर्षे जागृती करत आहेत, तर ते सत्यच आहे आणि आता तसेच घडत आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका (२१.१०.२०१६)

 

समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या
प्रबोधनानंतर नवरात्रोत्सवातील गैरप्रकार थांबणे 

     मीरा सोसायटी, शंकरशेट रोड येथील श्री. संजय हरिजा यांनी त्यांच्या भागात स्थानिक मंडळामध्ये होणारे गैरप्रकार समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्या मंडळात दांडिया खेळल्यानंतर डीजेवर बीभत्स नाच केले जात. डीजेच्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा पुष्कळ त्रास होत असे. समितीच्या कार्यकर्त्यांनी मंडळाला संपर्क करून त्यांचे प्रबोधन केल्यावर तेथील गैरप्रकार थांबले. – श्री. अभिजीत देशमुख, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, पुणे जिल्हा. (२१.१०.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात