सनातन संस्थेच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत देहली येथे झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

१. समाजात श्राद्धाचे महत्त्व सांगण्यासाठी प्रवचनांचे आयोजन

‘समाजातील श्राद्धाविषयीचे चुकीचे समज दूर व्हावेत आणि हिंदूंना श्राद्धाची अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती व्हावी, यासाठी नोएडा येथील साधकांनी ११ ठिकाणी प्रवचने घेतली. या प्रवचनांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. यांमध्ये शाळेतील शिक्षक, मंदिरात येणारे भाविक आणि इतर यांचा समावेश होता. या प्रवचनांच्या माध्यमातून श्राद्धाविषयीचे शास्त्र सांगितले. यांमध्ये श्राद्धाविषयी जिज्ञासूंना असणार्‍या अनेक शंकांचेही निरसन करण्यात आले.

१ अ. क्षणचित्रे

१. नोएडा येथील साधिका कु. किरण महतो हिने कोंडली निवासी संकुल पार्क येथे प्रवचनापूर्वी १० मिनिटे आलेल्या लोकांना श्राद्धाविषयीच्या प्रवचनाविषयी माहिती दिली. त्यामुळे तेथे पुष्कळ लोक जमले. त्यांपैकी काही लोकांनी या प्रवचनाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली असल्याचे सांगितले.

२. नोएडा, उत्तर प्रदेश येथील एका शाळेत तेथील शिक्षकांसाठी श्राद्धाविषयीच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनामुळे या शाळेचे मुख्याध्यापक अतिशय प्रभावित झाले. त्यांनी साधकांना ७८ शाळांची सूची दिली, ज्यांमध्ये प्रवचनांचे आयोजन करता येऊ शकेल.

२. हस्तपत्रकांचे वितरण

हिंदूंना श्राद्धाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती देणार्‍या ३२० हस्तपत्रकांचे साधकांनी वितरण केले.

३. नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगण्यासाठी प्रवचनांचे आयोजन

नवरात्रोत्सवाचे महत्त्व आणि शास्त्रीय माहिती देण्यासाठी नोएडा, उत्तर प्रदेश येथे ३ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली आणि २ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले.

– सौ. तृप्ती जोशी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात