सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र मोहिमेचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा आढावा

१. सोलापूर जिल्हा

१ अ. संपर्क

‘सोलापूर जिल्ह्यात एकूण ४८ नवरात्र मंडळांना संपर्क केले.

१ आ. फ्लेक्स फलक आणि कापडी फलक यांद्वारे प्रबोधन

१. जिल्ह्यात धर्मशिक्षणाची माहिती देणारे ४६ फ्लेक्स फलक लावण्यात आले. ७ मंडळांनी २४ फ्लेक्स फलक स्वतः विकत घेऊन लावले.

२. तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या मार्गात आणि गावात प्रबोधनपर कापडी फलक लावून भाविकांचे स्वागत करण्यात आले.

३. सोलापूर येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने निघालेल्या दुर्गादौडीचे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने पारंपरिक पोशाखात ध्वजपूजन आणि औक्षण करून स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी रणरागिणी शाखेचा फ्लेक्स फलक हातात घेतला होता.

१ इ. ‘ऊठ भगिनी जागी हो !’ या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागरण

१. सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट येथे रणरागिणी शाखेच्या वतीने ‘ऊठ भगिनी जागी हो !’ हे पथनाट्य २३ ठिकाणी सादर करण्यात आले. या पथनाट्यात धर्माभिमानी मुलांनी सहभाग घेतला. या पथनाट्याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घेतला.

२. अक्कलकोट येथील धर्माभिमानी सौ. लता चन्नमा (रोटरी क्लबच्या डी.सी. लिटरसी डायरेक्टर) यांनी ५ मंडळांत पथनाट्य सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यास साहाय्य केले. बुर्ला कॉलेजमध्ये कोजागिरी पौर्णिमेला १ सहस्र मुलींना पथनाट्य दाखवण्याचे नियोजन केले.

३. अक्कलकोट येथील बल्लश्‍वर, गणेश मंडळ आणि श्रीरामनगर येथे काही शिक्षकांनी पथनाट्य पाहिले. शिक्षिका सौ. सौदी यांनी शाळेत व्याख्यान घेण्यास सांगितले. शिक्षिका सौ. संध्या बशेट्टे यांनी प्रत्येक शनिवारी ६ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार वर्गाची मागणी केली.

क्षणचित्रे

१. सोलापूरमधील अंत्रोळीकर नगर येथील ‘जय सुखसमृद्धी माता नवरात्र मंडळा’त पथनाट्य सादर करण्यात आले. तेव्हा तेथील पदाधिकारी श्री. फुटाणे हे पुष्कळ प्रभावित झाले.

२. अंत्रोळीकर नगरमध्ये पथनाट्य सादर करत असतांना सोलापूर येथील ‘इन केबल’ने त्याचे चित्रीकरण केले आणि ५ वेळा प्रक्षेपण केले. या केबलची दर्शकसंख्या १० लक्षहून अधिक आहे.

३. पंढरपूर येथे एका मंडळामध्ये दाखवत असलेले पथनाट्य पाहून रस्त्यावरील बटाटेवडे विक्रेत्याने स्वतः पुढे येऊन भेट घेतली आणि आणखी एका मंडळाला संपर्क करण्यास सांगितले. तेथे गेल्यावर लगेच पथनाट्य सादर करण्याची संधी मिळाली. त्या वेळी ४५० जणांची उपस्थिती होती.

४. सोलापूर येथील ‘नवदुर्गा नवरात्र मंडळ’ येेथे पथनाट्याचे सादरीकरण चालू असतांना १४ लक्षहून दर्शकसंख्या असलेल्या ‘वृत्तदर्शन चॅनल’ने चित्रीकरण करून ते ८ वेळा वाहिनीवर दाखवले.

१ ई. नवरात्रीविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारी प्रवचने

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, सांगोला, बार्शी आणि सोलापूर येथे, तसेच सोलापूर जिल्ह्याला जोडलेल्या बारामती, फलटण आणि धाराशिव येथे, अशी एकूूण ३४ ठिकाणी नवरात्रीची प्रवचने करण्यात आली.

१ उ. श्री भवानीदेवीच्या लहान आकाराच्या लॅमिनेटेड चित्रांचे वितरण

१. सोलापूर जिल्ह्यात श्री भवानीदेवीची लहान आकाराची २ सहस्र ६०० लॅमिनेटेड चित्रे प्रायोजित झाली. ही चित्रे तुळजापूर येथे येणार्‍या भाविकांना सनातन संस्थेच्या वतीने भेट देण्यात आली.

१ ऊ. कुंकुमार्चनाविषयी माहिती देणे

सोलापूर जिल्ह्यात कुंकुमार्चन विधीविषयी लोकांना माहिती देण्यात आली. ‘तो कसा करायचा ?’, हे साधकांनी दाखवले. एकूण १८ ठिकाणी कुंकुमार्चन विधी झाले. याचा लाभ अनेक स्त्रियांनी घेतला.

१ ए. प्रसाराच्या वेळी सनातनने प्रकाशित केलेल्या ‘सात्त्विक रांगोळी’ आणि ‘श्री विठ्ठल’ या लघुग्रंथांना मोठा प्रतिसाद लाभला.

२. कोल्हापूर जिल्हा

२ अ. नवरात्र मंडळांना संपर्क

जिल्ह्यात एकूण ४० नवरात्र मंडळांना संपर्क केले.

२ आ. व्याख्यानांचे आयोजन

१. कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे येथील दुर्गामाता मंडळ येथे दुर्गामाता दौडीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना ‘नवरात्रीचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानासाठी बोलावले होते.

२. कोल्हापूर जिल्ह्यातील पांचगाव येथील भैरवनाथ मंदिर येथे समितीच्या वतीने ‘नवरात्रोत्सव’ हा विषय मांडण्यात आला. तेथे धर्मशिक्षणवर्ग चालू होत आहे.

३. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील ‘महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर’ येथे रणरागिणी शाखेच्या वतीने ‘नवरात्र’ हा विषय मांडला. तेथे महिलांच्या धर्मशिक्षण वर्गाची मागणी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात