हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रसारकार्याचा देहली राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील आढावा

१. नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी
निवेदने 
आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून व्यापक प्रसार !

अ. ५.१०.२०१६ या दिवशी नोएडा शहर दंडाधिकारी यांना समितीचे कार्यकर्ते श्री. अरविंद गुप्ता आणि श्री. हरिकिशन शर्मा यांनी नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी निवेदन दिले.

 

आ. ३.१०.२०१६ या दिवशी देहली फेड ३, नोएडा येथील एका नवरात्रोत्सव मंडळाला नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी निवेदन देण्यात आले.

 

२. हस्तपत्रकांचे वितरण 

 नोएडा येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवाविषयी प्रबोधन करणार्‍या हस्तपत्रकांचे समाजात वितरण केले.

 

३. सनातन संस्थेच्या वतीने नवरात्राविषयी प्रवचन

 अ. नवरात्रीविषयीच्या प्रवचनाचा २५ जिज्ञासूंनी घेतला लाभ !

नोएडा येथील डब्ल्यू सेक्टर २२ मधील शिवमंदिरात सनातनच्या साधिका सौ. राजराणी माहुर यांनी ‘नवरात्र’ या विषयावर प्रवचन केले. या प्रवचनाचा २५ जिज्ञासूंनी लाभ घेतला.

आ. सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रवचने

फरिदाबाद येथील नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गापूजा सत्संग आणि कीर्तन मंडळ यांमध्ये ८ प्रवचने करण्यात आली. या प्रवचनांचा २५० जिज्ञासूंनी लाभ घेतला. जिज्ञासूंना ही प्रवचने पुष्कळ आवडली.

 

४. ग्रंथ प्रदर्शन

      रामलीला उत्सवानिमित्त नोएडा येथे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.’

 

– सौ. क्षिप्रा जुवेकर, देहली
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात