महर्षींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे तंतोतंत आज्ञापालन करून त्यांचा प्रत्येक संदेश समष्टीला तळमळीने पोचवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

१. दौर्‍यावर असल्यामुळे प्रतिदिनच्या
नियोजनात सतत पालट होणे आणि 
वर्तमानात
राहून महर्षींचे आज्ञापालन करणे, हे सर्वच पुष्कळ अद्भुत असणे

     ‘गेल्या दीड वर्षापासून चालू असलेल्या सप्तर्षि जीवनाडी वाचनामध्ये महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू दैवी प्रवासाच्या सेवेत आहेत. यामध्ये सतत करावे लागणारे भ्रमण, प्रवास, विविध देवस्थानांना जाणे, साधकांच्या रक्षणासाठी महर्षींनी सांगितलेले उपाय करणे, असे चालू आहे. पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे सप्तर्षि जीवनाडीचे वाचन करतात. बहुतांश वेळा प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी आणि आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी महर्षि उपाय सांगतात. यामध्येे नामजप, यज्ञ, पूजाविधी, मंदिरांत दर्शनाला जाणे, दक्षिणा देणे, अशा अनेक गोष्टी असतात. ठराविक काळात ठराविक अन्नपदार्थ न खाणे, असे अनेक उपाय आणि दैवी प्रवासाच्या वेळी आलेल्या अनुभूती, अशा पुष्कळ गोष्टी असतात. दौर्‍यावर असल्यामुळे प्रतिदिनच्या नियोजनात सतत पालट होत असतात. सतत वर्तमानात राहून महर्षींचे आज्ञापालन करावे लागते. हे सर्वच पुष्कळ अद्भुत आहे.

 

२. शारीरिक त्रासाची पर्वा न करता महर्षींच्या
कृपेने आलेल्या अनुभूती, जप, उपाय हे सर्व 
समष्टीला
लवकर मिळावे, यासाठी पहाटे उठून टंकलेखन करणे

शारीरिक त्रासाची पर्वा न करता महर्षींच्या कृपेने आलेल्या अनुभूती, जप, उपाय हे सर्व समष्टीला लवकर मिळावे, यासाठी पहाटे उठून टंकलेखन करणे आणि हे ‘आताच केले नाही तर अमूल्य इतिहासाची नोंदच होणार नाही’, असे सद्गुरु गाडगीळ काकूंनी सांगणे

सततच्या प्रवासामुळे आणि दिवस-रात्र सेवेमुळे सद्गुरु काकूंचे शरीर दुखत असते. एकाच स्थितीत अर्ध्या ते एक घंट्यापेक्षा अधिक वेळ त्या बसू शकत नाहीत. असे असूनही नाडीवाचनात महर्षींनी समष्टीसाठी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्या तंतोतंत आज्ञापालन करतात. कधी रात्री २ ते ३ घंटे झोपून पहाटे ३.३० ते ४ वाजता त्या उठतात. सर्व घडामोडी टंकलेखन करून दैनिकात देण्यासाठी पाठवतात. तसेच महर्षींच्या कृपेने आलेल्या अनुभूती, जप आणि उपाय यांचे त्या त्या वेळी टंकलेखन करून त्वरित पुढे पाठवतात. त्या मागे ‘समष्टीला लवकरात लवकर हे सर्व मिळावे’, अशी त्यांची तळमळ असते. त्या पाठीमागे दोन उशांचा आधार घेऊन सर्व अनुभूतींचे आणि महर्षींच्या संदेशाचे टंकलेखन करतात. त्या म्हणतात, ‘‘त्रास नेहमीचेच आहेत. हे आता नाही केले, तर या अमूल्य इतिहासाची नोंदच होणार नाही.’’

– श्री. दिवाकर आगावणे, तमिळनाडू (८.४.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात