गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांच्याकडून कौतुक !

1
केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सनातनचे साधक श्री. हरिकृष्ण शर्मा

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : येथील कविनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात सनातन संस्थेनेही प्रदर्शन लावले होते. यात अध्यात्म, राष्ट्ररक्षण, धर्मशिक्षण, आयुर्वेद आदी विषयांचे ग्रंथ आणि त्यांची माहिती देणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देतांना केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही.के. सिंह यांनी सनातनचे प्रदर्शन केंद्रही पाहिले. हे प्रदर्शन चांगले आहे, असे कौतुकही त्यांनी या वेळी केले. सनातनच्या या प्रदर्शनाचा २ सहस्र भाविकांनी लाभ घेतला.

तसेच भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. प्रकाश यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी उत्तरप्रदेशचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री. चंद्रशेखर आदी मान्यवरही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात