कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विलासपूर (हरियाणा) येथे सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन !

जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1
सनातनच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथ आणि फलक प्रदर्शन बघतांना जिज्ञासू

विलासपूर : येथे प्रसिद्ध कपालमोचन मेळाव्याच्या निमित्ताने अध्यात्माविषयी मार्गदर्शन आणि धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. यासह हिंदु भाविकांना प्रत्येक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजण्यासाठी धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावले होते. सहस्रो जिज्ञासूंनी या प्रदर्शनाला भेट देऊन अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांतील अमूल्य माहितीचा लाभ घेतला. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे हिंदु संस्कृतीचा र्‍हास होत आहे. या कठीण परिस्थितीत सनातन संस्था अध्यात्म आणि धर्मप्रसाराचे अमूल्य कार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित जिज्ञासूंनी व्यक्त केली, तसेच संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाला हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनचे सदस्य श्री. भोपाल सिंह यांनी भेट देऊन संस्थेचे कार्य जाणून घेतले.

क्षणचित्र

प्रदर्शनाच्या ठिकाणी विनामूल्य बायबल वाटण्यात येत होते. (हिंदूंनो, तुमच्या सण-उत्सवाच्या निमित्ताने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या अशा धूर्त ख्रिस्त्यांपासून सावधान ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर काही जिज्ञासूंनी बायबल परत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात