सनातनच्या २०१७ च्या तमिळ भाषेतील पंचांगाचे प्रकाशन !

panchang_prakashan
डावीकडून श्री. एच्. राजा, श्रीमती उमा आनंदन् आणि सौ. उमा रविचंद्रन्

चेन्नई : ५ नोव्हेंबर या दिवशी तमिळ भाषेतील २०१७ वर्षाचे सनातन पंचांगाचे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि तमिळनाडूमधील कृतिशील अन् प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. एच्. राजा यांंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन समारंभ श्री. राजा यांच्या निवासस्थानी सनईच्या मंगल वाद्यात झाला. या वेळी सनातन पंचांगाचे हळद, कुंकू, अक्षता आणि पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. चेन्नई येथील धर्माभिमानी श्रीमती उमा आनंदन् यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् या वेळी उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात