कुमटा (कर्नाटक) येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’च्या माध्यमातून सनातनचा दिवाळीच्या वेळी धर्मप्रसार !

vinayak_shanbag
वाहिनीवरून मार्गदर्शन करतांना श्री. विनायक शानभाग (डावीकडे) आणि श्री. रवि गावडी

कुमटा (कर्नाटक) : येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’चे मालक श्री. रवि गावडी गेल्या काही महिन्यांपासून सनातन धर्मशिक्षणा विषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील ४ लाख लोकांपर्यंत श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी पोचते. या वेळी दिवाळीला ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ तसेच ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमंजुनाथ वाहिनीने सनातन संस्थेला आवाहन केले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ याविषयावर, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. विद्या विनायक शानभाग यांनी पाडव्याच्या दिवशी ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’या विषयावर मार्गदर्शन केले.

सनातनच्या कार्याने प्रभावित झालेले श्री. रवि गावडी यांनी शानभाग दांपत्याला या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगायला सांगितले. मार्गदर्शनानंतर श्री. रवि गावडी यांनी ‘सनातनच्या साधकांना एवढ्या लहान वयात हे सर्व ज्ञान कसे मिळाले’, असे विचारले असता साधकांनी, ‘हे सर्व आध्यात्मिक ज्ञान आम्हाला आमची गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथांच्या माध्यमातून दिले’, असे सांगितले. शानभाग दांपत्याने घातलेला सात्त्विक पोषाख आणि त्यांनी मांडलेली धर्मशास्त्रातील सूत्रे ऐकल्यावर श्री. रवि गावडी अन् वाहिनीचे कर्मचारी यांनी ‘लवकरात लवकर रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात येऊन, आश्रम, आश्रमजीवन आणि साधक यांचे चित्रीकरण अन् मुलाखत घेऊन आमच्या वाहिनीवर दाखवू’, असे सांगितले.

धारवाड (कर्नाटक) येथील स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर हिंदु
जनजागृती समितीकडून दीपावलीमागील अध्यात्मशास्त्राची माहिती सादर !

धारवाड (कर्नाटक) : २८ ऑक्टोबर या दिवशी येथील स्थानिक खाजगी दूरचित्रवाहिनी ‘न्यूज टाइम’ आणि ‘सी ९’ यांवरून दीपावलीमागील अध्यात्मशास्त्राची माहिती सांगण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या कु. स्फूर्ती बेनकनवारी यांनी ही माहिती सांगितली. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आदींविषयीची आध्यात्मिक माहिती सांगण्यात आली. तसेच चिनी फटाक्यांचे घातक दुष्परिणाम सांगून त्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात