नऊवारी साडीचे आध्यात्मिक महत्त्व !

१. नऊवारी साडी नेसल्यानंतर लगेचच देहातील सर्व चक्रे
उघडून संपूर्ण देह रोमांचित होत आहे, असे जाणवणे आणि देहाच्या
रंध्रारंध्रातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दैवी शक्ती प्रक्षेपित होत असल्याची अनुभूती येणे

AVV_Icon_colमहर्षींच्या सांगण्याप्रमाणे आम्ही रामनाथी आश्रमात बगलामुखी याग केला होता. त्या वेळी मी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. साडी नेसतांना माझा सारा देहच चैतन्याने न्हाऊन निघत आहे, असे मला जाणवू लागले. सार्‍या देहातच वीरश्री संचारल्यासारखे होऊ लागले आणि वाटले, आता मला या विश्‍वात कुणीच हरवू शकणार नाही. देहातील सर्व चक्रे जागृत होऊन माझ्या रोमारोमांतून दैवी शक्ती प्रक्षेपित होत आहे, असे वाटू लागले आणि खरंच, नऊवारी साडी नेसल्याने काय होऊ शकते, याची प्रत्यक्ष प्रचीती आली.

आपल्या पूर्वजांनी आपण परिधान करत असलेल्या पोशाखांविषयी किती दूरदृष्टीने विचार केला आहे, असे वाटले आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. देवताही नऊवारी साडीत असतात आणि देवही धोतर परिधान करून का असतात, याचेही महत्त्व पटले. असे वाटले, नुसते पोशाखाविषयी बोलून उपयोगी नाही, तर या पोशाखाची एकदा तरी प्रचीती घ्यावी, इतके आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले हे पोशाख दैवी आहेत.

 

२. विदेशी पोशाखांत लपेटलेल्या आईला मुलांनी आई तरी कसे म्हणावे ?

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

सध्या विदेशी पोशाखांचे सर्वत्र प्रस्थ आल्याने आपण आपलीच संस्कृती विसरलो आहोत. आता आई… म्हणायलाही मुलाला लाज वाटेल, असाच आईचा पोशाख असतो. विदेशी कपड्यांमध्ये लपेटल्या गेलेल्या या आईला तिच्यातील देवी तत्त्वाची प्रचीती कशी येणार ? यासाठी हिंदु संस्कृतीतील आचार आणि विचार यांचे पालन करणारीच आई हवी; परंतु अशी आई मिळायलाही पूर्वजन्माचे भाग्य लागते. ते फारच थोड्या जणांच्या नशिबी येते. विदेशी आचार आणि विचार यांत गुंतल्याने आम्हीच आमच्यातील दैवी संस्कृतीला, म्हणजेच हिंदुत्वाला मुकलो आहोत, तर इतरांची काय कथा ?

कलियुगातील एक कटू सत्य म्हणजे काही वर्षांनी नऊवारी साडी ही लोकांना पहाण्यासाठी संग्रहालयातील काचेच्या पेटीत जतन करून ठेवावी लागेल.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कुंभकोणम्, तमिळनाडू. (२१.१०.२०१६, सकाळी ७.३९)

(वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. त्याच्या आरंभी काही काळ नऊवारी साडी पहाण्यासाठी लोकांना संग्रहालयात जावे लागेल. पुढे मात्र नऊवारी साडीचे पुनरुत्थान होईल. – संकलक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात