चीनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे १०० मृत्यूमुखी

  • ११ प्रांतांना फटका

  • १० लाख नागरिकांनी इतरत्र आश्रय घेतला

शांघाय – चीनमध्ये मुसळधार पावसामुळे किमान ११ प्रांतांना फटका बसला आहे. मध्य आणि दक्षिण चीनमध्ये आलेल्या पुरामुळे किमान १०० नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. सुमारे १५ लाख हेक्टर शेतभूमीवरील पीके उद्ध्वस्त झाली असून २० अब्ज युआनपेक्षाही (३ अब्ज डॉलर्सहून अधिक) आर्थिक हानी झाल्याचे येथील शासनाने म्हटले आहे. या संकटामुळे सुमारे १० लाख नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे.

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

        १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (चीनमध्ये मुसळधार पावसामुळे १०० नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

गेली अनेक वर्षे सनातन सांगत असलेला आपत्काळ ताे हाच ! लाेकांनाे अशा आपत्काळात वाचण्यासाठी साधना करा !