मलेशियातील मंदिरात असलेल्या देवतेच्या मूर्तीची विटंबना !

विदेशातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतात चर्चवरील कथित आक्रमणानंतर भारतात असहिष्णुता असल्याचे सांगणार्‍या अमेरिकींप्रमाणे भारतीय राज्यकर्ते विदेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांचा जाहीरपणे निषेध करतील का ?

जॉर्जटाऊन (मलेशिया) – पेनांग राज्यात असलेल्या बयान बारू येथील देवा श्री मथुराई वीरन मंदिरातील एका देवतेच्या मूर्तीची अज्ञातांनी विटंबना केल्याची घटना २ जुलैच्या रात्री घडली. सदर मूर्ती ही तूर्तास धार्मिक विधींसाठी वापरण्यात येत नसल्याची माहिती येथील दक्षिण पूर्व जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुप्त लाइ फाह हिन यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाचे कार्यालय ज्या ठिकाणी होते, ती जागा रिकामी करण्याचे तेथील जागेच्या मालकाने सांगितले होते. हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याची गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे.