सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार !

महाराष्ट्र समाज उज्जयिनीचा शरदोत्सव उत्साहात साजरा !

उज्जैन, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र समाज उज्जयिनीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गायक आणि संगीत दिग्दर्शक श्री. दिलीप महाशब्दे आणि कनकश्री भट्ट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरस्वतीदेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात भावगीत, अभंग, नाट्यगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. येथील टिळक स्मृती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशच्या मराठी साहित्य अकादमीचे संचालक श्री. अश्‍विन खरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. रविंद्र उज्जैनकर यांनी केले.

या शरदोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला. या सभागृहात संस्थेच्या वतीने आचारधर्म, देवालय दर्शन, क्रांतीकारक आदी विषयांवर फ्लेक्सफलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच संस्थेने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे विक्री केंद्रही या ठिकाणी लावण्यात आले. याचा जिज्ञासूंनी लाभ घेतला. हे प्रदर्शन लावण्यासाठी महाराष्ट्र मंडळासह मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष अमृतफळे आणि संयोजक श्री. अभय आरोंदेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (अध्यात्मप्रसारासाठी सहकार्य करणारे श्री. अमृतफळे आणि श्री. आरोंदेकर यांचे अभिनंदन ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात