ज्योतिर्लिंग नवरात्र मंडळात सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने प्रबोधन !

मार्गदर्शन करतांना डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले
मार्गदर्शन करतांना डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले

मिरज, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील नदीवेस भागातील ज्योतिर्लिंग नवरात्र मंडळात १० ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने नवरात्रीची माहिती सांगण्यात आली. यात आदर्श गरबा कसा खेळावा, कुंकुमार्चनाचे महत्त्व, नवरात्र उत्सवातील गैरप्रकार यांविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी ही माहिती सांगितली, तर सौ. कांता वांडरे यांनी एक घंटा श्री दुर्गादेव्यै नमः। हा नामजप सामूहिकरित्या, तसेच कुंकुमार्चन प्रत्यक्ष करवून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात