रायगड येथे सनातनच्या वतीने नवरात्रोत्सवात जनप्रबोधन

Navratri_606

रायगड : येथे नवरात्रोत्सवानिमित्त जनप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले. ११ नवरात्रोत्सव मंडळांना निवेदन देऊन उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. काही मंडळांनीही आध्यात्मिक माहिती देणारे सनातन संस्थेचे १७ फ्लेक्स फलक प्रायोजित केले. १८ ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ४९४ ग्रंथांचे वितरण झाले. साधकांनी २३ ठिकाणी नवरात्रोत्सवाविषयी माहिती सांगणारी प्रवचने घेतली. धुतुम (ता. उरण) येथे महिलांनी प्रवचन ऐकल्यावर आणखी १ घंटा मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या महिलांनी व्यासपीठ फुलांनी सजवून भावपूर्ण सिद्धता केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात